*जी. टी. पाटील महाविद्यालयात स्व. गो. स. मराठे पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जी. टी. पाटील महाविद्यालयात स्व. गो. स. मराठे पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन*
*जी. टी. पाटील महाविद्यालयात स्व. गो. स. मराठे पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जी. टी. पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात स्वर्गीय गो. स. मराठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. एम. जे. रघुवंशी यांच्या हस्ते स्व. गो. स. मराठे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. संदीप पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. समिती प्रमुख डॉ. उपेंद्र धगधगे यांनी नॉनस्व. मराठे यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाची उजळणी करून त्यांच्या कार्याचे स्मरण केले.
कार्यक्रमाचे संयोजन डॉ. दिनेश देवरे, डॉ. मनोज शेवाळे व प्रा. संदीप बडगुजर यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले. कार्यक्रमास महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. स्व. गो. स. मराठे यांच्या प्रेरणादायी कार्याची आठवण महाविद्यालयात जपली जात असून, त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी पुनरुच्चार केला.



