*नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात सिकलसेल जनजागृती सप्ताहाची अभिनव सुरुवात*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात सिकलसेल जनजागृती सप्ताहाची अभिनव सुरुवात*
*नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात सिकलसेल जनजागृती सप्ताहाची अभिनव सुरुवात*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यात 11 ते 17 डिसेंबर दरम्यान सर्व ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सिकलसेल सप्ताह साजरा करण्यात येणार असून त्या अनुषंगाने आज 11 डिसेंबर रोजी डॉ.नरेश पाडवी अतिरक्त जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. हरिश्चंद्र कोकणी सिकलसेल नोडल अधिकारी, डॉ. कैलास राजपूत निवासी वैद्यकीय अधिकारी, डॉ. जाफर तडवी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या उपस्थितीत नंदुरबार शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. तसेच जिल्हा रुग्णालय येथे सिकलसेल आजार संदर्भात रुग्णाची तपासणी करण्यात आली. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नरेश पाडवी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सुलोचना बागुल, वैद्यकीय अधीक्षक महिला रुग्णालय डॉ किसन पावरा, डॉ मंगलसिंग पावरा, डॉ रणजीत पावरा, डॉ राहुल वसावे, डॉ किरण जगदेव, विनायक गावित आदी उपस्थित होते.
सिकलसेल हा एक आनुवंशिक (वंशपरंपरागत) रक्ताचा आजार आहे, ज्यात शरीरातील लाल रक्तपेशींचा आकार सामान्य गोल न राहता विळ्यासारखा होतो, ज्यामुळे त्या कडक आणि चिकट बनतात, रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करतात आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी करतात, परिणामी तीव्र वेदना आणि अशक्तपणा येतो. हा आजार HBB जनुकांमधील बदलामुळे होतो आणि यामुळे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊन अनिमिया (रक्तक्षय) होतो, सिकलसेलची मुख्य लक्षणे तीव्र वेदना, अशक्तपणा आणि थकवा, वारंवार संक्रमण होणे. हाडांना सूज येणे, डोळ्यांची समस्या ही आहेत.
हा आजार आनुवंशिक आहे, जो पालकांकडून जनुकांमार्फत मुलांना मिळतो. HBB जनुकात बदल झाल्यास सिकल पेशी तयार होतात.
यावर उपचार करण्याची पद्धत रक्ताची तपासणी करून त्याचे निदान केले जाते. उपचारांमध्ये वेदना व्यवस्थापन, औषधे, आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये रक्त संक्रमण किंवा स्टेम सेल प्रत्यारोपण यांचा समावेश असतो. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाने या रोगाबद्दल जनजागृती आणि तपासणीसाठी कार्यक्रम राबवले आहेत. जिल्हा सिकलसेल कार्यक्रमांतर्गत पुरविल्या जाणाऱ्या सेवा स्क्रीनिग चाचणी म्हणून मोफत solubility चाचणी DBS आणि HLL द्वारे सिकलसेल निश्चित निदानासाठीची HPLC तपासणी करण्यात येते. सिकलसेल नियंत्रण कक्ष द्वारे समुपदेशन (रोगाचा प्रसार, प्रतिबंध, निदान आणि व्यवस्थापन) तसेच सरकारी योजनांचा लाभ मिळण्यास मदत करण्यात येते. रोगप्रतिबंधक आणि लक्षणात्मक उपचार दिले जातील.(हायड्रोक्सीयुरिया आणि फॉलिक ऍसिड) गरजेनुसार सिकलसेल पीडित व्यक्तीला मोफत रक्त संक्रमण करण्यात येते. प्रसूतिपूर्व गर्भजल तपासणी BMT Center बोरीवली येथे तसेच संकल्प फाउंडेशन मार्फत मोफत तपासणी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. संजय गांधी निराधार योजना मध्ये सिकलसेल रुग्णांना 1500 मासिक आधार MJPJAY/PMJAY मध्ये सिकलसेल रुग्णास Hip replacement due to AVN of Head of femur, sickle cell crisis, Thalassemia major साठी वार्षिक विमा रु 5 लाख प्रति कुटूंब देण्यात येतो. दरवर्षी 19 जून रोजी सिकलसेल दिन साजरा करण्यात येतो. तसेच 11 डिसेंबर ते 17 डिसेंबरपर्यत सिकलसेल सप्ताह साजरा केला जातो.
भारतात, विशेषतः आदिवासी भागांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळतो. सिकलसेल वाहक व्यक्तीमध्ये लक्षणे दिसत नसली तरी त्यांना हा आजार होण्याचा धोका असतो, त्यामुळे तपासणी करणे महत्त्वाचे आहे. भारत सरकारने सिकलसेल अनिमिया निर्मूलनासाठी मोहीम सुरू केली आहे. तरी सर्व सरकारी दवाखान्यात वय वर्ष 1 ते 40 वर्षे वयोगटातील नागरिकांनी (नवजात शिशु, असतील गरोदर माता असतील,) यांची तपासणी करून घ्यावी तसेच लग्नापूर्वी जोडफ्यांची रक्त तपासणी करून घ्यावी. नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या जिल्हा सिकलसेल रुग्ण समुपदेशन केंद्र जिल्हा रुग्णालय नंदुरबार, येथे या बाबत आपणास अधिक माहिती मिळेल असे आवाहन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नरेश पाडवी यांनी केलेले आहे. जिल्ह्यात सिकलसेल निर्मुलनासाठी संपूर्ण आयोग्य यंत्रणा सज्ज झाली असून सर्व ग्रामीण उपजिल्हा रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या माध्यामातून सिकलसेल निर्मुलनासाठी कार्य सुरु आहे. सदर आजार जिल्ह्यातून हद्दपार व्हावा व निरोगी नंदुरबार व्हावे या साठी या अभियानामध्ये प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरातील सर्व महिला व माता यांना तपासणीसाठी सक्रियपणे सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी व मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे यांनी केले आहे.



