*एनटीव्हीएसचा औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एनटीव्हीएसचा औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी*
*एनटीव्हीएसचा औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाचा विद्यार्थ्यांनी विभागीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून चमकदार केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोणारे यांच्या अंतर्गत धुळे येथे विभागीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धेत नंदुरबार तालुका विधायक समितीचा औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून विविध खेळांमध्ये प्रभावी प्रदर्शन करीत 10 मेडल्स मिळविले.
सचिन पावरा याने भालाफेमध्ये सुवर्णपदक,5000 मीटर प्रथम ज्योती वसावे आणि जयश्री पावरा हिने गोल्ड मेडल मिळवले. त्याचप्रमाणे जयश्री पावरा, ज्योती वसावे, प्रतिमा गावित, मनीषा पावरा या विद्यार्थिनींनी 4 बाय सुवर्णपदकाची कमाई केली तर अंजनी पावराने 100 मीटर धावणे व लांब उडी या दोन्ही स्पर्धेत 2 ब्राँझ मेडल मिळवले. जयश्री पावरा हिने 800 मीटर धावणे या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले. सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक प्रा.राहुल पाटील मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष आमदार
चंद्रकांत रघुवंशी, उपाध्यक्ष मनोज रघुवंशी, सचिव यशवंत पाटील, प्राचार्य वैशाली शेवाळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.



