*भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापनासाठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम केव्हीके नंदुरबार येथे उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापनासाठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम केव्हीके नंदुरबार येथे उत्साहात संपन्न*
*भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापनासाठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम केव्हीके नंदुरबार येथे उत्साहात संपन्न*
नंदूरबार(प्रतिनिधी):-डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार आणि रीड्स भारत फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 11 ते 12 डिसेंबर 2025 रोजी भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमात वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख राजेंद्र दहातोंडे, प्रा. संदीप राजपूत (उद्यानविद्या विभाग), डॉ. भूषण बिरारी (रोगशास्त्र विभाग), रीड्स भारत फाऊंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक किरण गोरे आणि उद्यानविद्या तज्ज्ञ डॉ. वैभव गुर्वे उपस्थित होते. आपल्या उद्घाटनपर भाषणात दहातोंडे सरांनी स्थानिक पातळीवर भाजीपाला रोपे उपलब्ध झाल्यास वाहतूक खर्चात बचत होते आणि शेतकऱ्यांना दर्जेदार रोपे सहज मिळतात, असे सांगितले.
तांत्रिक सत्रांमध्ये प्रा. राजपूत यांनी रोपवाटिकेची मूलभूत तत्त्वे, परवाना प्रक्रिया व नैतिकता याबाबत माहिती दिली; डॉ. बिरारी यांनी रोपवाटिकेतील रोग व कीड व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले; तर डॉ. वैभव गुर्वे यांनी प्रो-ट्रे रोपवाटिका तंत्रज्ञानाचे सविस्तर प्रात्यक्षिक देऊन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. याशिवाय जयंत उत्तारवार यांनी रोपवाटिकेचे प्रकार आणि पाणी व्यवस्थापनाविषयी माहिती दिली. प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून वावद येथील बळीराजा नर्सरीला अभ्यासभेट आयोजित करण्यात आली, जिथे भूषण पाटील यांनी रोपवाटिका उभारणी, खर्च व येणाऱ्या अडचणींबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन रीड्स भारत फाऊंडेशनचे समन्वयक राकेश खलाने यांनी केले, तर किरण माराठे व कैलास सोनवणे यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण सहकार्य केले व कार्यक्रमाचे आभार देवसिंग वळवी यांनी व्यक्त केले.



