*जि.प.शाळा नगारे येथे ‘सकारात्मक शिस्त’ विशेष सत्रासह श्रावणी केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जि.प.शाळा नगारे येथे ‘सकारात्मक शिस्त’ विशेष सत्रासह श्रावणी केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न*
*जि.प.शाळा नगारे येथे ‘सकारात्मक शिस्त’ विशेष सत्रासह श्रावणी केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नवापूर तालुक्यातील श्रावणी केंद्रांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नगारे व जि.प शाळा सागाळी यांच्या संयुक्त विद्यमाने नगारे येथे शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, जननायक बिरसा मुंडा, सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे पूजन करून केंद्रप्रमुख निंबा पाकळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मदन गावीत, माजी सरपंच आनंद नाईक, मुख्याध्यापक गणेश पाडवी, महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष गोपाल गावित, श्रावणी केंद्रीय मुख्याध्यापक महेंद्र नाईक, मुख्याध्यापक गणेश पाडवी शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद जाधव, डी एंड जी शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर नांद्रे, आदर्श माध्यमिक खडकी शाळेचे मुख्याध्यापक शरद बडगुजर, माध्यमिक विद्यालय खडकी शाळेचे मुख्याध्यापक संजय निकम, ग्यान प्रकाशन फाउंडेशन समन्वयक क्रांती सोनवणे तसेच विविध शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक बांधव उपस्थित होते. केंद्रप्रमुख निंबा पाकळे यांनी शिक्षण परिषद मध्ये मार्गदर्शन केले.
शासनाचे दिशा-सूचनांनुसार ‘सकारात्मक शिस्त’ विशेष सत्र, राज्यातील काही शाळांमध्ये घडलेल्या शारीरिक शिक्षेच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, सुरक्षितता आणि शिक्षक-विद्यार्थी नाते अधिक दृढ करण्यासाठी ‘सकारात्मक शिस्त’ ही संकल्पना अत्यावश्यक असल्याचे शासनाने निर्देशित केले आहे.
त्या अनुषंगाने शासन निर्णय, परिपत्रके शासन निर्णय क्र. शैगुवि 2015 / (80/15) एस.डी. 6 दि. 22 जून 2015, शासन परिपत्रक क्र. संकीर्ण 3216/(94/2026) प्रशिक्षण दि. 1 जानेवारी 2016, सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे पत्र दि.5/7/23, मा.नमन गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी सो. जि.प. नंदुरबार यांनी 30/8/2024 रोजी जिल्हा गुणवत्ता कक्ष सभेत दिलेल्या शिक्षण परिषद अंमलबजावणी सूचना, राशैसप्रपम/साव्यावि/शि.प./2025,दि.29 नोव्हेंबर रोजीचे संचालक यांचे पत्र व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार यांच्या आदेशानुसार विशेष मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. मार्गदर्शनात खालील मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला. शिक्षण अधिकार अधिनियमातील तरतुदी व शिक्षकांची जबाबदारी, शारीरिक, शाब्दिक, भावनिक, मानसिक तसेच भीती दाखवून दिली जाणारी शिक्षा आणि त्याचे स्वरूप सविस्तर स्पष्ट करण्यात आले.
शिक्षेचे विद्यार्थ्यांवरील दुष्परिणाम भीती निर्माण होणे, न्यूनगंड, अध्ययनगती कमी होणे, अबोलपणा, भित्री किंवा आक्रमक प्रवृत्ती निर्माण होणे इत्यादी परिणामांवर चर्चा, मेंदूवरील परिणाम – ‘डाऊन शिफ्टिंग’ सिद्धांत (डॉ. पॉल मॅक्लिन) भावनिक ताण निर्माण झाल्यावर मेंदूची बौद्धिक कार्यक्षमता कशी कमी होते, याचे सोपे वैज्ञानिक स्पष्टीकरण देण्यात आले. “मूल अभ्यासात असताना रागावल्यास बुद्धीचे काम थांबून मेंदू बचावात्मक भागाकडे कार्य करतो.” सकारात्मक शिस्त तत्वे, तंत्रे आणि उपक्रम, संवाद, सहकार्य, समुपदेशन आधारित वर्ग व्यवस्थापन, सकारात्मक शिस्तीचे व्यावहारिक मार्ग, देश-विदेशातील शैक्षणिक विचारवंतांचे विचार अलीकडील घटनांशी संदर्भ जोडून शिक्षकांची संवेदनशीलता वाढवण्यावर भर, मागील शिक्षण परिषदेचा आढावा व मूल्यवर्धन 3.0 शिक्षण परिषद पर्व 6 अंतर्गत मागील परिषदेतील विषयांची अंमलबजावणी मूल्यवर्धन 3.0 प्रगती, शाळानिहाय लक्षणीय बाबी निपुण महाराष्ट्र अभियानाच्या मासिक नियोजनाचा आढावा घेण्यात आला. जिल्हास्तरावरून प्राप्त पीपीटीच्याच्या आधारे चर्चा करून केंद्र व वर्गाचे डिसेंबर महिन्याचे नियोजन निश्चित करण्यात आले. यावेळी सीआरसी सदस्य महेंद्र नाईक, केशव पवार, ग्यान प्रकाशन फाउंडेशन जिल्हा समन्वय क्रांती सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. पालक परिषद नियोजन डिसेंबर महिन्यात केंद्रातील सर्व शाळांमध्ये पालक परिषदेचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या. मार्गदर्शिकेच्या आधारे शाळांना आवश्यक मार्गदर्शन केंद्रप्रमुख निंबा पाकळे यांनी केले. नवापूर तालुकास्तरीय शिक्षक गटातून गोळाफेक व फोटोग्राफी स्पर्धेत
जिल्हा परिषद शाळा हरणमाळचे शिक्षक गोपाल गावित यांनी मिळवलेल्या द्वितीय क्रमांक, तसेच मिलींद जाधव मराठी ऑलंपियाड स्पर्धेत द्वितीय क्रमांक, मनिषा कोकणी, व्हॉलीबॉल स्पर्धेत सहभाग बद्दल केंद्रप्रमुखांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षण परिषद संपल्यानंतर सर्व शिक्षकांना लिंक भरण्याच्या सूचना देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जि. प. शाळा सागाळी मुख्याध्यापक मिलींद जाधव सर , उपस्थितांचे आभार जि.प.शाळा नगारे मुख्याध्यापक गणेश पाडवी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैशाली कोकणी, वासु वसावे, सुरेश कोकणी यांनी सहकार्य केले. आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात श्रावणी केंद्राची शिक्षण परिषद यशस्वीरित्या पार पडली.



