*क्रीडा युवा उत्सवात जी.टी. पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाची घवघवीत कामगिरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*क्रीडा युवा उत्सवात जी.टी. पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाची घवघवीत कामगिरी*
*क्रीडा युवा उत्सवात जी.टी. पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाची घवघवीत कामगिरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथील जी.टी. पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हा व विभागीय क्रीडा युवा उत्सवात उल्लेखनीय कामगिरी करून महाविद्यालयाचा गौरव वाढविला. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. एम. जे. रघुवंशी यांच्या हस्ते संपन्न झाला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्यांनी म्हटले की, “विद्यार्थ्यांनी मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर आपले व महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे. महाविद्यालय विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यास सदैव तत्पर आहे.”
या कार्यक्रमाला डॉ. सुलतान पवार, एनसीसी प्रमुख डॉ. व्ही.झेड. चौधरी, प्रा. संदीप साक्रीकर, प्रा. अंकुश रघुवंशी, क्रीडा संचालक डॉ. तारक दास व डॉ. डी.डी. गावीत यांची उपस्थिती लाभली.
जिल्हा क्रीडा युवा उत्सवात समूह लोकगीत, कथा, कविता, चित्रकला, नवोपक्रम या कलाप्रकारांमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रशंसनीय यश मिळविले. तसेच विभागीय क्रीडा युवा उत्सवात पूजा पवार या विद्यार्थिनीने कथा या कलाप्रकारात तृतीय क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड पक्की केली.
सदर विद्यार्थ्यांना डॉ. मनोज शेवाळे व प्रा. जितेंद्र पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असून त्यांच्या कार्याचेही विशेष कौतुक करण्यात आले.
जी.टी. पाटील महाविद्यालयाने मिळविलेले हे यश विद्यार्थ्यांच्या कष्टांचे योग्य फल म्हणून गौरविले जात आहे.



