*25 डिसेंबरपासून मुंबई-नांदेड-मुंबई विमानसेवा स्टार एअरकडून तिकिट बुकिंग सुरु-खा.अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*25 डिसेंबरपासून मुंबई-नांदेड-मुंबई विमानसेवा स्टार एअरकडून तिकिट बुकिंग सुरु-खा.अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश*
*25 डिसेंबरपासून मुंबई-नांदेड-मुंबई विमानसेवा स्टार एअरकडून तिकिट बुकिंग सुरु-खा.अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश*
नांदेड(प्रतिनिधी):-नांदेड-मुंबई बहूप्रतिक्षित विमानसेवेचा 25 डिसेंबरपासून शुभारंभ होणार असून, स्टार एअर कंपनीने तिकीट विक्रीही सुरू केली आहे. खा. अशोक चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे हे यश आहे. मुंबई - नांदेड - मुंबई ही विमानसेवा तूर्तास मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असे तीन दिवस उपलब्ध असेल. मात्र, लवकरच ती सेवा दररोज सुरु होणार आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून दुपारी 4.25 वाजता विमानाचे उड्डाण होऊन सायंकाळी 5.40 वाजता ते नांदेडच्या श्री गुरु गोबिंदसिंघजी विमानतळावर उतरेल. परतीच्या प्रवासासाठी हे विमान सायंकाळी 6.10 वाजता उड्डाण करून रात्री 7.25 वाजता मुंबईला पोहोचेल. ही विमानसेवा 15 नोव्हेंबरपासून नियोजित होते. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे त्यास विलंब झाला. दरम्यानच्या काळात माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी सदरहू तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला. नांदेड - मुंबई विमानसेवेला मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरच स्लॉट मिळावा, यासाठी देखील ते सातत्याने आग्रही राहिले. या विमान सेवेमुळे नांदेड जिल्ह्यासह हिंगोली, परभणी, लातूर, वाशिम, हिंगोली अशा अनेक जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. नांदेडहून मुंबईसाठी थेट विमानसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री के. राममोहन नायडू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे खा. अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.



