*नायगांव पंचायत समितीचा कारभार रामभरोसे पुन्हा प्रभारी राज सुरू ?*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नायगांव पंचायत समितीचा कारभार रामभरोसे पुन्हा प्रभारी राज सुरू ?*
*नायगांव पंचायत समितीचा कारभार रामभरोसे पुन्हा प्रभारी राज सुरू ?*
नरसी(प्रतीनिधी):-भ्रष्टाचाराची बजबज पुरी बनलेल्या नायगाव पंचायत समितीमध्ये दस्तूर खुद्द नायगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांनी केलेल्या पोलखोल नंतर या कार्यालयातील प्रशासकीय कारभार ढासाळला आणि नवनियुक्त गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे यांनी काढता पाय घेतला यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडली घरकुलाचे बिले देखील रखडले असून दरम्यान मोठी गैरसोय होत असल्याचे बोलले जात आहे. बीड जिल्ह्यातून प्रशासकीय बदलीवर आलेले गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे यांनी काढता पाय घेतल्यानंतर मुखेड तालुका पंचायत समिती येथे सहाय्यक गटविकास अधिकारी पदावर कार्यरत असणारे शिवाजी ढवळे यांनी येथील पंचायत समिती कार्यालयात प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला मात्र मागील चार महिन्यापासून नायगाव तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना एक छदामही मिळाला नाही त्यामुळे घरकुलाची कामे रखडली आहेत दरम्यान डिजिटल सिग्नेचर अवेलेबल नसल्याचे कारणे सांगण्यात येत आहेत त्यामुळे गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांना आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यकार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी येथील नायगांव पंचायत समितीला कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नियुक्त करावा अशी मागणी नायगांव तालुक्यातून जनतेकडून केली जात आहे.



