*कॉपर वायर चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हा उघडकीस, 1 लक्ष 21 हजार 600 रुपये किमतीची तब्बल 152 किलो कॉपर वायर हस्तगत, एकूण 2 आरोपी त
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कॉपर वायर चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हा उघडकीस, 1 लक्ष 21 हजार 600 रुपये किमतीची तब्बल 152 किलो कॉपर वायर हस्तगत, एकूण 2 आरोपी त
*कॉपर वायर चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हा उघडकीस, 1 लक्ष 21 हजार 600 रुपये किमतीची तब्बल 152 किलो कॉपर वायर हस्तगत, एकूण 2 आरोपी ताब्यात*
नंदूरबार(प्रतिनिधी):-दि.10 नोव्हेंबर 2025 ते 29 नोव्हेंबर 2025 रोजीचे दरम्यान तालुका पोलीस ठाणे हद्दीतील आक्राळे, ठाणेपाडा, आखातवाडे, गंगापूर, नवागाव, इंद्रिहट्टी अशा शेत शिवारातील सुझलॉन टॉवरमधील कॉपर केबल कोणीतरी अज्ञ गात इसमाने धारदार हत्याराने कापुन फिर्यादी यांचे संमतीशिवाय लबाडीच्या इरादयाने चोरी केल्या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 414/2025 भा.न्या. संहिता कलम 303(2) प्रमाणे दि. 1 डिसेंबर 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरु असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की, तलवाडे बु.बु. पो. खर्दे खुर्द गावातील रोहित ठाकरे याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने सदरची सुझलॉन केबल चोरी केली आहे, अशी खात्रिशीर माहिती मिळालेवरुन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी लागलीच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास कारवाई कामी रवाना केले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तालुका पोलीस ठाणे हद्दीत जाऊन मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने शोध घेतला असता संशयित आरोपी नामे रोहित ठाकरे हा तलवाडे येथील त्याचे घरी मिळुन आला. त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव रोहित सुभाष ठाकरे, वय 30 वर्षे, रा.तलवाडे, बु.ब्रु. पो.खर्दे खुर्द ता.जि. नंदुरबार असे सांगितले. त्यास नमुद गुन्हयाबाबत विचारपुस करता तो असंबंध्द अशी उत्तरे देऊ लागला. त्यास अधिकचे विश्वासात घेऊन विचारणा करता त्याने सदरचा गुन्हा त्याचे नवागाव इंद्रिहट्टी येथील साथीदारांसह केला असल्याची कबूली दिली. त्याअन्वये स्था.गु.शा. पथकाने सदर गुन्हयातील आरोपी रोहित ठाकरे याचे साथीदार यांचा नवागाव येथे शोध घेतला असता साथीदार युवराज मोहन भिल, वय 30 वर्षे, रा. नवागाव इंद्रिहट्टी ता.जि. नंदुरबार हा मिळुन आला. सदर दोन्ही आरोपीतांना गुन्हयातील चोरी केलेल्या मालाबाबत विचारपुस करता त्यांनी सदरचा मुद्देमाल हा विक्री करण्याचे उद्देशाने नंदुरबार ते दोंडाईचा रोडवर रजाळे फाटा परिसरातील झाडाझुडूपात लपवून ठेवला असल्याचे सांगितले. त्याअन्वये सदर आरोपींनी लपवून ठेवलेली एकुण 1 लक्ष 21 हजार 600 रुपये किमतीची 152 किलो वजनाची सुझलॉन टॉवरमध्ये वापरण्यात येणारी कॉपर केबल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि मुकेश पवार, विकास गुंजाळ, पोहेकों/दिनेश चित्ते, मुकेश तावडे, विशाल नागरे, मोहन ढमढेरे, सचिन वसावे, नितीन गांगुर्डे, पोकों/अभय राजपुत, राजेंद्र काटके यांनी केली आहे.



