*आदिवासी अकादमी नंदुरबार आणि क.ब.चौ. उ. म.वि. संचलित विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मोलगी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नंदुरबार जिल्हास्तरीय अविष्कार 2025 स्पर्धेचे उद्घाटन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आदिवासी अकादमी नंदुरबार आणि क.ब.चौ. उ. म.वि. संचलित विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मोलगी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नंदुरबार जिल्हास्तरीय अविष्कार 2025 स्पर्धेचे उद्घाटन*
*आदिवासी अकादमी नंदुरबार आणि क.ब.चौ. उ. म.वि. संचलित विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मोलगी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नंदुरबार जिल्हास्तरीय अविष्कार 2025 स्पर्धेचे उद्घाटन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आदिवासी अकादमी, नंदुरबार आणि क.ब.चौ. उ. म.वि. संचलित विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मोलगी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नंदुरबार जिल्हास्तरीय अविष्कार 2025 स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज अत्यंत उत्साहात व भव्यतेत पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांचे संशोधनातील योगदान, नवकल्पनांचे महत्त्व आणि आदिवासी क्षेत्रातील शैक्षणिक प्रगती यावर त्यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा प्रशासन आणि विद्यार्थी यांच्या समन्वयातनं विशेष प्रकल्प राबवण्यासंदर्भात पुढाकार घ्यावा असेही त्यांनी आवाहन केले केला. असेही त्यांनी आवाहन केले.
उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी अकादमीचे संचालक डॉ. किशोर एफ. पवार यांनी भूषवले. ‘‘अविष्कारसारख्या उपक्रमामुळे विद्यार्थी सामाजिक –वैज्ञानिक समस्यांकडे नवदृष्टीने पाहतात आणि नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याची क्षमता विकसित होते,’’ असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. स्मिता देशमुख यांनी केले. अविष्कार उपक्रमाची उद्दिष्टे, विद्यार्थ्यांमधील संशोधन संस्कृतीचा विकास आणि स्पर्धेची रूपरेषा त्यांनी प्रभावीपणे उपस्थितांसमोर मांडली. प्रमुख पाहुणे म्हणून
प्राचार्य एम. जे. रघुवंशी, व्यवस्थापन परिषद सदस्य,
प्रा. के. एस. विश्वकर्मा (निरीक्षक -अविष्कार), हे उपस्थित राहिले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या संशोधन मॉडेल्सचे कौतुक केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विज्ञान, सामाजिक विकास, पर्यावरण, तंत्रज्ञान आणि उद्योजकता अशा विविध क्षेत्रांतील नाविन्यपूर्ण कल्पना सादर केल्या. या अविष्कार स्पर्धेत एकूण 183 संशोधन प्रस्ताव सादर झालेत, यात एकूण 256 स्पर्धकांनी सहभाग घेतला. निवड झालेल्या स्पर्धकांना दिनांक 30 व 31 डिसेंबर रोजी विद्यापीठ स्तरावर आपली कामगिरी सादर करण्याची संधी मिळणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. माधव कदम यांनी उत्तमरीत्या केले, तर आभार प्रदर्शन योगेश राणे यांनी तर प्रास्ताविक स्मिता देशमुख यांनी केले. कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. अविष्कार 2025 च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची ओढ वाढून, भविष्यात नवे संशोधक आणि उद्योजक घडतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदिवासी अकादमीचे प्रा. हर्षल चौरे, प्रा. राजेश पावरा, प्रा. करमसिंग पावरा, प्रा. रविंद्र पवार, प्रा. विपुल वसावे, डॉ. अर्चना पाटील, प्रतिभा गांगुर्डे व सर्व कर्मचारी तसेच मोलगी महाविद्यालयाचे प्रा. यांनी परिश्रम घेतले.



