*शहरात अवैधरित्या जुगार खेळणाऱ्यांवर पोलीसांची कारवाई, स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलीसांची संयुक्त कारवाई, एकुण 7 आरोपी ताब्यात*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शहरात अवैधरित्या जुगार खेळणाऱ्यांवर पोलीसांची कारवाई, स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलीसांची संयुक्त कारवाई, एकुण 7 आरोपी ताब्यात*
*शहरात अवैधरित्या जुगार खेळणाऱ्यांवर पोलीसांची कारवाई, स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलीसांची संयुक्त कारवाई, एकुण 7 आरोपी ताब्यात*
नंदुरबार(प्रतिनिधी):-"जिल्हयात अवैध धंदयावर वेळोवेळी कडक कारवाई सुरू असून जिल्हयातील अवैध बाबींची माहिती काढून त्यांचेवर कठोर कारवाई करणेबाबत सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी निर्देश दिले आहेत." त्याअनुषंगाने मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी नंदुरबार शहरातील जळका बाजार येथे एका बंद घरामध्ये काही इसम 52 पत्त्यांचे कॅटवर झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत असले बाबत खात्रिशीर माहिती मिळाली, त्याअन्वये जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांनी लागलीच आपआपले पथकास मिळालेल्या गोपनिय माहितीची खात्री करुन संयुक्तरित्या कारवाई करणेकामी रवाना केले. मिळालेल्या गोपनिय माहितीचे ठिकाणी स्था.गु.शा. व शहर पोलीसांचे पथकाने जाऊन खात्री केली असता, जळका बाजार येथे एका बंद घरामध्ये पुढून व मागील बाजुस घरात प्रवेश करता तेथे 07 इसम हे टेबलाचे भोवती बसुन जुगाराचा खेळ खेळत असल्याचे दिसुन आले. त्यांना पथकाने जागीच ताब्यात घेऊन त्यांचे नाव विचारता दिपक पांडुरंग चौधरी वय 28 वर्षे, रा. चौधरी गल्ली, नंदुरबार, निरंजन भगवान माळी, वय- 24 वर्षे, रा.साक्रीनाका, नंदुरबार, भुषण सुदाम ईशी, वय- 27 वर्षे, रा.साक्रिनाका, नंदुरबार, चेतन शरद चौधरी, वय 20 वर्षे, रा. चौधरी गल्ली, नंदुरबार, सुनिल प्रमोद दांडेकर, वय- 41 वर्षे, रा. बागवान गल्ली, नंदुरबार, विजय दिलीप पाटील, वय 23 वर्षे, रा.धुळेनाका, नंदुरबार, सुनिल पुंडलीक पेंढारकर, वय 50 वर्षे, रा. आंबेडकर चौक, नंदुरबार असे सांगितले. वरील नमुद सर्व इसम हे स्वतःचे ताब्यात रोख रक्कम बाळगुन बेकायदेशीररित्या झन्नामन्ना नावाचा 52 पत्त्यांचा जुगाराचा हार जितचा खेळ स्वतःचे आर्थिक फायदयासाठी खेळतांना व खेळवितांना जुगाराच्या साधनांसह मिळून आले असुन त्यांचेकडुन एकुण 16.060 किंमतीची रोख रक्कम मुद्देमालासह जप्त करण्यात आली आहे. त्याअन्वये नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 683/2025 महा. जुगार कायदा कलम 4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील अधिक तपास सुरु आहे.
सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि विकास गुंजाळ, शहर पो. ठाणे पोउपनि भुनेश मराठे तसेच पोहेकॉ महेंद्र नगराळे, राकेश मोरे, बापु बागुल, ज्ञानेश्वर पाटील, विनोद जाधव, पोना/दिपक वारुळे, पोकों/आनंदा मराठे, किरण मोरे, प्रविण वसावे, भगवान मुंडे, मपोकों/सोनिया चौधरी, सविता तडवी अशांनी केली आहे.



