*सौंदळ रेल्वे स्थानकावरील गैरसोय दूर करा मंगेश पांचाळ यांचे खासदार नारायण राणे यांना निवेदन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सौंदळ रेल्वे स्थानकावरील गैरसोय दूर करा मंगेश पांचाळ यांचे खासदार नारायण राणे यांना निवेदन*
*सौंदळ रेल्वे स्थानकावरील गैरसोय दूर करा मंगेश पांचाळ यांचे खासदार नारायण राणे यांना निवेदन*
राजापूर(प्रतिनिधी):- सौदळ रेल्वे स्थानकाला हाॅल्ट स्टेशन म्हणून मंजूर करण्यात आले आहे परंतु या स्थानकावर कसलीच सुविधा नसल्याने प्रवाशांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे सौंदळ रेल्वे स्थानकावरील गैरसोय दूर करावी तसेच कोकण कन्या किंवा राज्यराणी (तुतारी) एक्स्प्रेस या दोन्ही गाड्यांपैकी एका गाडीला थांबा द्यावा अशा मागणीचे निवेदन बागवेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश पांचाळ यांची खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन दिले आहे. सौंदळ रेल्वे स्टेशन हे गैरसोयीचे स्थानक बनले आहे या स्थानकावर प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्याने वयोवृद्ध, लहान मुले,गरोदर स्त्रिया यांना प्रवास करताना मोठी गैरसोय होत आहे फलाटावर शौचालय तसेच पिण्याचे पाणी यासारख्या मूलभूत सुविधाही उपलब्ध नाहीत. तसेच कोकणकन्या व राज्यराणी (तुतारी) एक्स्प्रेस या दोन्ही गाड्यांपैकी एका गाडीला सौंदळ रेल्वे स्थानकात थांबा देण्यात यावा अशी राजापूर पूर्व विभागातील जनतेची मागणी आहे. सदर गाडीला थांबा मिळाल्यास राजापूर पूर्व भागातील तसेच कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे उपरोक्त मागण्या त्वरित मार्गी लावा असे सामाजिक कार्यकर्ते मंगेश पांचाळ यांनी खासदार नारायण राणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.



