*जलजीवन योजनेसाठी त्वरित निधी उपलब्ध करा अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा तिवरे कोंडतिवरे ग्रामस्थांचा इशारा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जलजीवन योजनेसाठी त्वरित निधी उपलब्ध करा अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा तिवरे कोंडतिवरे ग्रामस्थांचा इशारा*
*जलजीवन योजनेसाठी त्वरित निधी उपलब्ध करा अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा तिवरे कोंडतिवरे ग्रामस्थांचा इशारा*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील पूर्व भागात वसलेल्या तिवरे कोंडतिवरे या गावांना गेली अनेक वर्षे तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे गावा खालून कोकण रेल्वे गेल्याने सर्व पाणी हे रेल्वेत उतरले आहे ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी दोन्ही गावांच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या तिवरे कोंडतिवरे विकास मंडळ (रजि) यांनी ग्रामपंचायत ते मंत्रालय स्तरावर गेली 2 वर्षे सातत्याने पाठपुरावा करत असून अथक प्रयत्नाने विकास मंडळाचे सचिन सूद यांच्या सततच्या प्रयत्नातून हि नळपाणी योजना वाटूळ धरणावरुन मंजूर करण्यात यश मिळवले आहे तो परंतु योजना मंजूर होऊनही ही योजनेचे निधीअभावी काम रखडले आहे. राजापूर पाणीपुरवठा विभागाकडे संपर्क साधला असता निधी उपलब्ध नसल्याने तालुक्यातील सर्वच गावातील पाणीपुरवठा योजना रखडल्याचे सांगण्यात येते. सध्या निवडणुकीची धामधूम सुरू असून वारेमाप पैसा उधळला जात आहे. शासनही या निवडणुकीवर करोडोंनी खर्च करत आहे मात्र जलजीवन योजना राबविण्यासाठी सरकारकडे निधी नाही तिवरे कोंडतिवरे ही गावे पूर्वेकडील दुर्गम भागात येत असल्याने दरवर्षी या गावांना मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे तसे पाहिले तर ही दोन्ही गावे इतर सोयीसुविधांपासूनही वंचित राहिली आहेत येत्या निवडणुकीआधी जलजीवन योजनेसाठी मंजूर केलेला निधी त्वरीत उपलब्ध करून द्यावा लोकप्रतिनिधीनी सदर योजना लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी पावले उचलावीत अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या वतीने तिवरे कोंडतिवरे विकास मंडळाने दिला आहे.



