*महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटना, नंदुरबार जिल्हा कार्यकारिणीतर्फे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना घरकुल व नरेगा कार्यक्रमांतर्गत, जबाबदारी निर्धारणाबाब
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटना, नंदुरबार जिल्हा कार्यकारिणीतर्फे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना घरकुल व नरेगा कार्यक्रमांतर्गत, जबाबदारी निर्धारणाबाब
*महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटना, नंदुरबार जिल्हा कार्यकारिणीतर्फे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना घरकुल व नरेगा कार्यक्रमांतर्गत, जबाबदारी निर्धारणाबाबत निर्माण झालेल्या समस्यांकडे तातडीने लक्ष वेधणारे निवेदन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटना, नंदुरबार जिल्हा कार्यकारिणीतर्फे आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांना घरकुल व नरेगा कार्यक्रमांतर्गत जबाबदारी निर्धारणाबाबत निर्माण झालेल्या समस्यांकडे तातडीने लक्ष वेधणारे निवेदन सादर करण्यात आले. संघटनेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दिनांक 6 व 8 डिसेंबर 2025 रोजी संघटनेतर्फे सामूहिक रजा आंदोलन आयोजित करण्यात येत आहे. शासनस्तरावर घरकुल व नरेगा योजना कार्यवाहीसंदर्भात उद्भवलेल्या अडचणींबाबत प्रशासनाने निर्णय न घेतल्यामुळे अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कामकाजात अडचणी निर्माण होत आहेत. महाराष्ट्र विकास सेवा महासंघाच्या मार्गदर्शनानुसार, राज्यभरातील अधिकारी सामाजिक रजा आंदोलनात सहभागी होत असून, शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. सामाजिक रजा आंदोलन 8 डिसेंबर 2025 पासून पुढे योग्य तो निर्णय होईपर्यंत सुरू राहील, असे संघटनेने स्पष्ट केले आहे. निवेदनावर जिल्ह्यातील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, सहायक गट विकास अधिकाऱ्यांच्या सह्या असून, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटना एकत्रितपणे कार्यरत असल्याचे यातून स्पष्ट होते.
संघटनेने प्रशासनास कळविले आहे की, शासनस्तरावर तातडीचा निर्णय न घेतल्यास जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या गतीवर परिणाम होऊ शकतो. संघटनेतर्फे निवेदन करणारे प्रमुख पदाधिकारी
चंद्रकांत पवार अध्यक्ष महाराष्ट्र विकास सेवा संघटना नंदुरबार,
गणेश मोरे सचिव,
उदय कुसुरकर उपाध्यक्ष, ईश्वर पवार समन्वयक,
देविदास देवरे कार्याध्यक्ष, अनिल बिरहाडे सहअध्यक्ष.



