*राजापूर तालुक्यातील बागवेवाडी येथील बीएसएनएल टॉवर अखेर जनतेसाठी खुला*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राजापूर तालुक्यातील बागवेवाडी येथील बीएसएनएल टॉवर अखेर जनतेसाठी खुला*
*राजापूर तालुक्यातील बागवेवाडी येथील बीएसएनएल टॉवर अखेर जनतेसाठी खुला*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील मौजे बागवेवाडी येथील बीएसएनएल (BSNL) टॉवर अखेर ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिकांसाठी सुरू झाला असून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कित्येक वर्षापासून नेटवर्कसाठी वंचित असलेल्या बागवेवाडीने बीएसएनएल टॉवरच्या रूपाने विकासाचे अजून एक पाऊल टाकले आहे. विद्यमान आमदार किरण सामंत आणि जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी तालुक्यातील मोबाईल नेटवर्क तातडीने करावे असे अधिकाऱ्यांना सांगितले. गावातील ग्रामस्थ बालमित्र मंडळाचे अध्यक्ष कमलेश गांगण यांनी लगेचच माहिती घेत किरण सामंत तसेच जिल्हाधिकारी रत्नागिरी, राजापूर यांच्याकडे धाव घेतली आणि कामाचा पाठपुरवठा करत तातडीने सर्वे करण्यास सांगितला. सरपंच कु.नीलम हातणकर यांनी लागणारी कागदपत्रे वेळोवेळी राजापूर कार्यालयामध्ये सुपूर्द केली आणि स्थानिक ग्रामस्थांशी संपर्क साधला. सदर सर्व प्रक्रियेमध्ये प्रशांत कुलकर्णी बीएसएनएल अधिकारी, सौ. अदिती नार्वेकर (भू कर मापक अधिकारी), रसाळ (बीएसएनएल अधिकारी रत्ना. डिव्हिजन), शिरसाट (रत्ना. डिव्हिजन), बागवेवाडी उत्कर्ष मंडळ मुंबई व ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मुंबईस्थित आणि गावातील सर्व ग्रामस्थ उपसरपंच शिवराम कामतेकर, मुंबई मंडळ अध्यक्ष संतोष शेट्ये, सचिव विजय पांचाळ, दशरथ कामतेकर, ग्रा.सदस्य सौ.तनुजा बावकर, तंटामुक्ती अध्यक्ष संजय रोडे, योगेश हातणकर, संतोष कामतेकर, संभाजी कुळये, माजी ग्रा.पं.सदस्य अनंत बावकर, राजेंद्र आगटे, महेश पांचाळ, मनोज पांचाळ, प्रमोद आगटे, मकरंद गांगण, वासुदेव चौगुले, अशोक शेट्ये, चंद्रकांत बावकर, अनंत कामतेकर आदी सर्वांचे सहकार्य लाभले.
सर्वेसाठी लगतचे जमीन मालक रोहन मसुरकर, संतोष आगटे, प्रवीण कामतेकर यांनी सुद्धा मोलाचं योगदान दिले.
आमदार किरण सामंत तसेच सर्व अधिकारी वर्ग, मुंबईस्थित आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्याबद्दल यावेळी आभार मानण्यात आले.



