*नंदुरबार जिल्ह्यातील मुंदलवड गावातील, सेंगलखेतपाडा शेतकऱ्यांच्या स्वस्त धान्य दुकानातील गड़बडीचा पर्दाफाश, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे निलंबनाची मागणी
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्ह्यातील मुंदलवड गावातील, सेंगलखेतपाडा शेतकऱ्यांच्या स्वस्त धान्य दुकानातील गड़बडीचा पर्दाफाश, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे निलंबनाची मागणी
*नंदुरबार जिल्ह्यातील मुंदलवड गावातील, सेंगलखेतपाडा शेतकऱ्यांच्या स्वस्त धान्य दुकानातील गड़बडीचा पर्दाफाश, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे निलंबनाची मागणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील मुंदलवड गावातील सेंगलखेतपाडा येथील ग्रामस्थांनी, नंदुरबार जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना एक गंभीर तक्रार सादर केली आहे. तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, येथे चालणाऱ्या स्वस्त धान्य दुकानाद्वारे रेशन वितरणात मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत आहे. ग्रामस्थाच्या म्हणण्यानुसार, ही दुकान महिला बचत गटाकडून चालवली जाते, ज्याचे नेतृत्व मोसरा पाडवी करतात. आरोप आहे की, हा गट लाभार्थ्यांना ठरवलेला राशन देण्याऐवजी धान्य काळ्या बाजारात विक्री करीत आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांमध्ये रेशन न वाटता ते काळ्या बाजारात विक्री केले आहे. ग्रामस्थांनी विचारणा केल्यावर महिला बचत गटाचे प्रमुख ग्रामस्थांना धमकी देतात. पोलिस विभाग, तहसीलदार, आमदार, खासदार यांच्याशी आमचे चांगले संबंध असल्याचा दावा करून, लोकांना त्रास देण्याचे प्रकार चालवित आहे. स्वस्त धान्य दुकान महिन्यात फक्त तीन दिवस उघडे ठेवले जाते, त्यामुळे ग्रामस्थांचे मोठे नुकसान होत आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीवर तालुका पुरवठा अधिकारी यांनी तपासणी केली असता. धान्याच्या अफरातफरीची आणि धान्याचा अपहार झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे, तसा चौकशी अहवाल अधिकारी यांनी ग्रामस्थांना दिला आहे. हे गंभीर प्रकरण लक्षात घेऊन मुंदलवड गावातील सेंगलखेतपाडा ग्रामस्थांनी महिला बचत गटावर त्वरित निलंबन आणि कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचा रेशन मिळू शकेल. या तक्रारी निवेदनावर विलास तडवी, कागडा वळवी, अशोक वळवी, वीरसिंह वळवी, विट्ठल वळवी, रवींद्र वळवी, महेश वळवी, दिनेश वळवी, सुनील वळवी, भांगा वळवी, सचिन वळवी, सुकेश वळवी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. ग्रामस्थ न्यायासाठी धडपड करत आहेत, जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी या प्रकरणात त्वरित आणि योग्य तोडगा काढतील. अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.



