*नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला गळती, शहाद्यातील काँग्रेस तालुका अध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर, नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांचा जिल्हा कार्य
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला गळती, शहाद्यातील काँग्रेस तालुका अध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर, नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांचा जिल्हा कार्य
*नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला गळती, शहाद्यातील काँग्रेस तालुका अध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर, नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांचा जिल्हा कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा स्वीकारणेबाबतचे पत्र नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी मुंबई येथील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना दिले आहे. यामुळे नंदुरबार जिल्हा काँग्रेस पक्षात एकच खळबळ उडाली आहे. मागील गेल्या नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिका निवडणूक कार्यकाळात शहादा तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष डॉक्टर सुरेश नाईक यांनी काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर, नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा याने जिल्ह्यातील काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी आपल्या जिल्हा कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना लेखी पत्राद्वारे राजीनामा दिला असून, त्यांनी दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मला काँग्रेस पक्षाने दिली, त्याबद्दल मी सर्व नेत्यांचे आभार मानतो, प्रकृतीच्या कारणास्तव मी जिल्हा कार्याध्यक्ष नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटी या पदाचा राजीनामा दिला असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. सदर राजीनामा दिलेल्या पत्राची प्रत नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आमदार शिरीषकुमार नाईक, राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एडवोकेट के सी पाडवी, नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी भाई नगराळे, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे एडवोकेट गणेश पाटील, नवापूर विधानसभा क्षेत्राचे युवराज करणकाळ, अक्कलकुवा विधानसभा निरीक्षक प्रकाश सोनवणे यांना सदर राजीनामा पत्राची प्रत पाठविण्यात आली आहे.



