*ग्रामपंचायत सदस्यावर कोयत्याने वार करणाऱ्या दोन्ही आरोपीतांना न्यायालयाने ठोठावली 7 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ग्रामपंचायत सदस्यावर कोयत्याने वार करणाऱ्या दोन्ही आरोपीतांना न्यायालयाने ठोठावली 7 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा*
*ग्रामपंचायत सदस्यावर कोयत्याने वार करणाऱ्या दोन्ही आरोपीतांना न्यायालयाने ठोठावली 7 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-उपनगर पोलीस ठाण्याचे हद्दीतील रनाळे खुर्द, ता.जि. नंदुरबार गावातील फिर्यादी नामे तुलसीदास रुस्तम गावीत, वय-33 वर्ष, व्यवसाय ग्राम पंचायत सदस्य हे 4 ऑक्टोबर 2021 रोजी सायंकाळी रनाळे खुर्द गावाबाहेर नैसर्गिक विधी करीता गेले होते. त्यावेळी आरोपी हरीष अशोक वळवी रा.रनाळे खुर्द, ता.जि. नंदुरबार व सुनिल जेरमनसिंग पाडवी रा.भादवड ता. नवापुर, जि. नंदुरबार असे तेथे येवून फिर्यादी यांचेकडे ऑनलाईन गेमचे रिचार्ज करण्याचे बहाण्याने आले होते. त्यावेळी वरील दोन्ही आरोपीतांनी फिर्यादी तुलसीदास गावीत यांचेसोबत वाद घालत फिर्यादी हे ग्रामपंचायत सदस्य असतांना त्यांनी हरीष वळवी याचे वडीलांचे रेशन दुकानाविरुध्द पुरवठा अधिकारी यांना तक्रार केली केली होती. त्याकारणावरुन आरोपी हरीष अशोक वळवी व सुनिल जेरमनसिंग पाडवी यांनी फिर्यादी तुलसीदास यांना जिवेठार मारण्याचे उद्देशाने कोयत्याने गंभीर दुखापत केले होते. त्यावेळी घटनास्थळावरुन दोन्ही आरोपीतांनी पळ काढला होता. सदर बाबत फिर्यादी तुलसीदास यांचे नातेवाईकांना घटनेबद्यल माहिती मिळाल्याने नातेवाईकांनी येत जखमी अवस्थेत तुलसीदास गावीत यांना सिव्हील हॉस्पीटल, नंदुरबार येथे उपचाराकरीता दाखल केले होते, त्यावेळी त्याअन्वये उपनगर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 437/2021, भा.द.वि. कलम 307,34 प्रमाणे 5 ऑक्टोबर 2021 रोजी दोन्ही आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड यांनी सदर गुन्हयाचा तपासात हरीष अशोक वळवी रा. रनाळे खुर्द, ता.जि. नंदुरबार व सुनिल जेरमनसिंग पाडवी रा.भादवड ता.नवापुर, जि. नंदुरबार यांना अटक करुन गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पध्द्तीने तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले होते. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपींविरुध्द् मुदतीत दोषारोपपत्र जिल्हा सत्र न्यायालय, नंदुरबार येथे सादर केले होते.
सदर खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. पेठकर यांचे समक्ष झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाचे वतीने साक्षीदार तपासण्यात आले. त्यात साक्षीदार, पंच व तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या आहेत. यावरुन सबळ पुराव्याचे आधारे आरोपी हरीष अशोक वळवी व सुनिल जेरमनसिंग पाडवी यांचेविरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने त्यांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश
के. आर. पेठकर, नंदुरबार यांनी भा.द. वि.क.-307,34 अन्वये दोषी ठरवत प्रत्येकी 7 वर्ष सश्रम कारावास व रुपये 5,000 दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सदर खटल्याचे कामकाज सरकारी पक्षाचे वतीने अति. सरकारी अभियोक्ता अॅड. व्ही.सी. चव्हाण यांनी पाहिले असून पैरवी अधिकारी म्हणून पोउपनि हेमंत मोहिते पैरवी अंमलदार पोहेकॉ नितीन साबळे, पोकों/देवेंद्र पाडवी, पोहेकॉ शैलेंद्र जाधव यांनी कामकाज पाहीले आहे. तपास अधिकारी तसेच अति. सरकारी अभियोक्ता यांचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार संजय महाजन व जिल्हा सरकारी वकील विनोद गोसावी यांनी अभिनंदन केले आहे.



