*सेंट मदर टेरेसा शाळेत क्रीडा दिवस साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सेंट मदर टेरेसा शाळेत क्रीडा दिवस साजरा*
*सेंट मदर टेरेसा शाळेत क्रीडा दिवस साजरा*
नंदूरबार(प्रतिनिधी):-26 नोव्हेंबर 2025 रोजी जिजामाता एज्युकेशन सोसायटी संचलित सेंट मदर टेरेसा शाळेत क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डाॅ.तेजल चौधरी यांनी प्रतिमापुजन केले, विद्यार्थ्यांनी कवायत संचलन करत अतिथींना मानवंदना दिली, शालेय स्तरावर विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, त्यात धावणे, दोरी उड्या, गोणपाट शर्यत, नागमोडी धावणे या प्रकारात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तर लहान गटात (नसरी ते सि. केजी) विद्यार्थ्यांच्या ससा उडी, फुगा पकडून धावणे, गलास मध्ये चेंडू टाकून धावणे, या स्पर्धेमुळे खेळात अधिक रंगत आली, पालकांनीही काही खेळात सहभाग घेतला, आपला प्रत्येक विद्यार्थ्यी शारीरिक दृष्ट्या सक्षम रहावा, विद्यार्थ्यांची शारीरीक वाढ योग्य पध्दतीने व्हावी यासाठी खेळ हे खूप महत्वाचे आहेत असे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा वाणी यांनी स्पष्ट केले.
क्रीडा दिवस साजरा करण्यामागील उद्देश, व त्याचे महत्व, म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण होते, तसेच नेतृत्व गुणाचा विकास होतो, विद्यार्थ्यी एकमेकांना सहकार्य करायला शिकतात तर त्यांचे आरोग्यही चांगले राहते असे मत श्रीमती मिना शिरसाठ यांनी आपल्या सुत्रसंचालनातून व्यक्त केले. विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देवून डाॅ. तेजल चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी समन्वयिका श्रीमती पुजा मंदाना, व श्रीमती राधिका दहेरा तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृद यांनी मेहनत घेतली, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



