*कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यासावर जोर, 'कस्तुरबा'ची सायल बनली सहाय्यक राज्यकर आयुक्त*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यासावर जोर, 'कस्तुरबा'ची सायल बनली सहाय्यक राज्यकर आयुक्त*
*कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यासावर जोर, 'कस्तुरबा'ची सायल बनली सहाय्यक राज्यकर आयुक्त*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुक्यातील टोकरतलाव येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाची माजी विद्यार्थिनी सायली गांगुर्डेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले असून, सहाय्यक राज्यकर आयुक्त, गट विकास अधिकारी पदावर निवड झाली आहे. ग्रामीण भागातून शिक्षण घेत कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यास, आत्मविश्वासाच्या जोरावर यश मिळवण्याचे सायलने सांगितले.
सायल गांगुर्डे ही नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित टोकरतलाव येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयची विद्यार्थिनी आहे. तिच्या यशाबद्दल शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राचार्य पुष्पेन्द्र रघुवंशी, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील, माजी नगरसेविका सोनिया राजपूत उपस्थित होत्या. कठोर परिश्रम सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वास याच्या जोरावर मिळवलेले सायलीचे यश ग्रामीण भागातून शिक्षण घेत विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरणार.



