*राजापूर तालुक्यातील पेंडखळे येथे 27 नोव्हेंबरपासून भव्य श्री दत्तजयंती उत्सव व श्री दत्तनाम सप्ताह*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राजापूर तालुक्यातील पेंडखळे येथे 27 नोव्हेंबरपासून भव्य श्री दत्तजयंती उत्सव व श्री दत्तनाम सप्ताह*
*राजापूर तालुक्यातील पेंडखळे येथे 27 नोव्हेंबरपासून भव्य श्री दत्तजयंती उत्सव व श्री दत्तनाम सप्ताह*
राजापूर(प्रतिनिधी):-श्री दत्त सेवा ट्रस्ट (रजि.) मुंबई संचलित श्री क्षेत्र दत्त मंदिर मु.पो. पेंडखळे जोगळे वाडी येथे दि. 27 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत भव्य श्री दत्तजयंती उत्सव व श्री दत्त नाम सप्ताह संपन्न होणार आहे यंदा मंडळाला 27 वर्षे पूर्ण होत आहेत. गुरुवार 27 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या भव्य सोहळ्यात श्री ग्रंथराज गुरुचरित्र पारायण, श्री संकल्प सिध्दी यज्ञ, श्री दत्तनाम गजर, अभिषेक,महाआरती माधुकरी, पालखी सोहळा, भजन इत्यादी कार्यक्रम होणार आहेत 3 डिसेंबर रोजी श्री दत्त याग यज्ञ, गुरुवार 4 डिसें रोजी श्री दत्तजयंती उत्सव काकड आरती, अभिषेक, महाआरती, महाप्रसाद, श्री दत्त जन्म उत्सव, पालखी सोहळा, स.11.30 ते 4 हळदीकुंकू समारंभ होणार आहे. गुरुवर्य कै. देऊ स. तरळ (संस्थापक व मुख्य विश्वस्त) यांचे हे कार्य पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे तसेच दत्त भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन विश्वस्त दिपक दे. तरळ, वासुदेव गो. मिरजोळकर, मनोहर शं पवार, नारायण घुमे, अंकुश लोळगे, नारायण मिरजोळकर (मुंबई अध्यक्ष), हर्षिकेश बापेरकर (मुंबई चिटणीस) सत्यवान पडयार (मुंबई खजिनदार), पांडुरंग मांडवकर (ग्रामिण अध्यक्ष) विजय चिपटे (ग्रामिण चिटणीस) विद्याधर गोडेकर (ग्रामिण चिटणीस) तसेच दत्त सेवा ट्रस्ट (मुंबई) दत्त परिवार, सर्व कार्यकारिणी आणि सभासद यांनी केले आहे.



