*अल्पवयीन मुलांनी वाहन चालवल्यास पालकांना दंड आणि शिक्षा होईल-उत्तम जाधव*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अल्पवयीन मुलांनी वाहन चालवल्यास पालकांना दंड आणि शिक्षा होईल-उत्तम जाधव*
*अल्पवयीन मुलांनी वाहन चालवल्यास पालकांना दंड आणि शिक्षा होईल-उत्तम जाधव*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील सर्व वाहनमालक/पालक यांनी आपले वाहन आपल्या अल्पवयीन मुलांना चालविण्यांस देऊ नये अन्यथा केंद्रीय मोटार वाहन अधिनियमाअंतर्गत दंड आणि शिक्षा होऊ शकेल असे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
कठोर कायदेशीर कारवाई. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी जारी केलेल्या सूचनेनुसार, अल्पवयीन मुलांनी वाहन चालवल्यास खालीलप्रमाणे गंभीर परिणाम होतील: दंड आणि शिक्षा: केंद्रीय मोटार वाहन अधिनियम 199 “अ” नुसार, वाहन मालक दोषी धरले जातील. वाहन मालक/चालक यांना रुपये 25 हजार दंड आणि 3 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. वाहन नोंदणी रद्द: दोषी वाहनाची नोंदणी बारा महिन्यांसाठी (एक वर्षासाठी) रद्द करण्यात येईल. अल्पवयीन मुलांवर परिणाम, गुन्हा करणाऱ्या अल्पवयीन मुलाला वयाच्या 25 वर्षांपर्यंत वाहन चालविण्याचा परवाना (अनुज्ञप्ती) मिळणार नाही.
अल्पवयीन मुलांच्या निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता असते, ज्यामुळे केवळ अल्पवयीन मुलांचेच नव्हे तर इतर नागरिकांचे जीवनही धोक्यात येते. त्यामुळे, सर्व वाहन मालक/पालकांनी आपले वाहन 18 वर्ष वयाखालील मुलांना चालविण्यास देऊ नये, असेही आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जाधव यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.



