*नंदुरबार जि.प.तील शिबिरात काकर्देचे सरपंच रेखाबाई माळी यांचे रक्तदान*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जि.प.तील शिबिरात काकर्देचे सरपंच रेखाबाई माळी यांचे रक्तदान*
*नंदुरबार जि.प.तील शिबिरात काकर्देचे सरपंच रेखाबाई माळी यांचे रक्तदान*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील जिल्हा परिषद व पंचायत समितीतर्फे आयोजित क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात नंदुरबार तालुक्यातील काकर्दे येथील सरपंच रेखाबाई राकेश माळी यांनी सहभाग घेवून रक्तदान केले.
नंदुरबार जिल्हा परिषदेत क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये नंदुरबार तालुक्यातील काकर्दे ग्रामपंचायतीच्या सरपंच रेखाबाई राकेश माळी यांनी यांनी रक्तदान केले. शिबिरात सहभागी होवून रक्तदान केल्याने नंदुरबार जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयकुमार कुसूरकर यांनी रक्तदाते सरपंच रेखाबाई माळी यांच्यासह इतर रक्तदान दात्यांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी राकेश माळी, प्रविण पाटील, विठोबा माळी यांच्यासह आदी उपस्थित होते.



