*मोंटेक्स बॉल असोसिएशन नंदुरबार तर्फे आयोजित स्पर्धेत, MKD English Medium School ला जिल्हा तृतीय क्रमांक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मोंटेक्स बॉल असोसिएशन नंदुरबार तर्फे आयोजित स्पर्धेत, MKD English Medium School ला जिल्हा तृतीय क्रमांक*
*मोंटेक्स बॉल असोसिएशन नंदुरबार तर्फे आयोजित स्पर्धेत, MKD English Medium School ला जिल्हा तृतीय क्रमांक*
नंदूरबार(प्रतिनिधी):-16 नोव्हेंबर 2025 (रविवार) रोजी जिल्हा क्रीडा संकुल, नंदुरबार येथे झालेल्या माँटेक्स बॉल क्रिकेट स्पर्धा (U-14) मध्ये MKD English Medium School च्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत नंदुरबार जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत U-14 गटात एकूण 8 संघ सहभागी झाले होते. दमदार खेळ दाखवत MKD च्या विद्यार्थ्यांनी प्रभावी कामगिरी केली.
या यशासाठी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक प्रशांत शिंदे, योगेश मोरे, चंद्रकांत बारस्कर आणि जगदीश जाधव
यांचे योग्य मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संचालक माननीय श्री शुभम किशोर दराडे, प्रशासकीय अधिकारी सचिन भोंगळे, आणि शाळेचे प्राचार्य माननीय जिनेश के. यू. यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.