*नाट्य नाटक स्पर्धेत अक्कलकुवा तालुका स्पर्धेत शिक्षण विस्तार अधिकारी कैलास लोहार प्रथम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नाट्य नाटक स्पर्धेत अक्कलकुवा तालुका स्पर्धेत शिक्षण विस्तार अधिकारी कैलास लोहार प्रथम*
*नाट्य नाटक स्पर्धेत अक्कलकुवा तालुका स्पर्धेत शिक्षण विस्तार अधिकारी कैलास लोहार प्रथम*
नंदूरबार(प्रतिनिधी):-शालेय शिक्षण व क्रीडा शिक्षण व महाराष्ट्र राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या समन्वयाने महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी अधिकारी यांच्या विविध स्पर्धांचे तालुका, जिल्हा, विभाग, राज्यस्तरावर आयोजन करण्यात आलेले आहे, यासाठी नाट्य नाटक स्पर्धा व विविध स्पर्धा अक्कलकुवा तालुक्यासाठी आयोजन जिल्हा परिषद केंद्र शाळा अक्कलकुवा येथे शनिवारी करण्यात आले होते. नाटक व नाट्य स्पर्धेत अक्कलकुवा तालुक्यातून कैलास लोहार शिक्षण विस्तार अधिकारी यांची जिल्ह्यासाठी निवड करण्यात आलेली आहे. त्यांनी वासुदेव वेशभूषा करून शिक्षण, आरोग्य, महिलांचे सुरक्षितता, व्यसनमुक्ती कुटुंब कल्याण, साक्षरता, मादक पदार्थ सेवन पाणी आडवा पाणी जिरवा इत्यादी विषयांवर सादरीकरण करून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. यासाठी गटविकास अधिकारी अहिरे, गटशिक्षणाधिकारी प्रशांत नरवाडे शिक्षण विस्ताराधिकारी राजेंद्र धनगर, राकेश देसले यांनी अभिनंदन केले आहे. स्पर्धेचे परीक्षण केंद्रप्रमुख अरिफ पिंजारी, दारासिंग पाडवी व कलाशिक्षक अजय शिंदे यांनी केले.



