*चावरा पब्लिक स्कूल नंदुरबारच्या मुलींचा विभागीय स्तरावर घवघवीत यश, नाशिक विभागीय रोलबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावून राज्यस्तरावर नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करणार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*चावरा पब्लिक स्कूल नंदुरबारच्या मुलींचा विभागीय स्तरावर घवघवीत यश, नाशिक विभागीय रोलबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावून राज्यस्तरावर नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करणार*
*चावरा पब्लिक स्कूल नंदुरबारच्या मुलींचा विभागीय स्तरावर घवघवीत यश, नाशिक विभागीय रोलबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावून राज्यस्तरावर नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करणार*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नाशिक विभागीयस्तरीय शालेय रोलबॉल क्रीडा स्पर्धेत नंदुरबार येथील चावरा पब्लिक स्कूलच्या 14 वर्षांखालील मुलींच्या संघाने प्रभावी खेळ करत प्रथम क्रमांक पटकावला. या विजयानंतर चावरा पब्लिक स्कूलचा संघ आता राज्यस्तरीय स्पर्धेत नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे, जिल्हा क्रीडा परिषद आणि धुळे जिल्हा रोलबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दोंडाईचा येथे ही स्पर्धा पार पडली. या विभागीय स्तरावरील स्पर्धेत एकूण चार संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत चावरा पब्लिक स्कूलच्या मुलींनी उत्कृष्ट समन्वय, वेग आणि कौशल्य दाखवत प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. अंतिम सामन्यात त्यांनी दमदार खेळ करत विजेतेपद निश्चित केले. या संघात कर्णधार एंजल गायकवाड, शांकभरी पाटील, आर्या पाटील, लवीषा तेजवानी, रुही सेवलानी, दिया विरवानी, युक्तिका पाटील, धनिषा ठाकरे, ओवी पवार, निरल वाणी, या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. संघाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल चावरा पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक फादर टेनी फरक्का, उपमुख्याध्यापक सिस्टर जेसलीन, ऍडमिनिस्टेट फादर रेमी वडकन, जनरल कॉर्डिनेटर सिस्टर दिव्या आणि सेक्शन कॉर्डिनेटर हर्षदा गुरव, सेक्रेटरी शितल पाटील यांनी खेळाडूंना अभिनंदन करून पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या विजयानंतर संपूर्ण शाळेत आनंदाचे वातावरण असून, या यशामागे क्रीडा शिक्षक संदीप खलाणे आणि प्रकाश मिस्तरी यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले आहे.