*भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंती लोभाणी येथे मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंती लोभाणी येथे मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली*
*भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंती लोभाणी येथे मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली* तळोदा(प्रतिनिधी):-तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत लोभाणी येथील लोकनियुक्त सरपंच सौ शानू प्रताप वळवी यांनी भगवान बिरसा मुंडा जयंती लोभाणी, बुधावली, येथे आयोजित केला होता. त्यावेळी मुलांना भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित माहिती दिली. व जिल्हा परिषद शाळा लोभाणी, बुधावली, गव्हाणीपाडा येथील शाळांना भगवान बिरसा मुंडा यांचे फोटो भेट दिली. आदिवासी पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच शानु वळवी होते. यावेळी शानु वळवी यांनी भगवान बिरसा मुंडा यांनी, जल जंगल, जमीन संरक्षण साठी आदिवासी समाजासाठी योगदान दिले या विषयी माहिती दिली. मुलांना पेन व चॉकलेट देण्यात आले. ग्रामपंचायत लोभानी येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसरपंच रमेश पाडवी, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.



