*पंडित जवाहरलाल नेहरू जयंती तसेच बालदिना निमित्त लाखापूर फॉरेस्ट येथे कार्यक्रम उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पंडित जवाहरलाल नेहरू जयंती तसेच बालदिना निमित्त लाखापूर फॉरेस्ट येथे कार्यक्रम उत्साहात संपन्न*
*पंडित जवाहरलाल नेहरू जयंती तसेच बालदिना निमित्त लाखापूर फॉरेस्ट येथे कार्यक्रम उत्साहात संपन्न*
तळोदा(प्रतिनिधी):-विद्यालयात बाल दिनानिमित्त विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले.तळोदा तालुक्यातील लाखापुर फॉरेस्ट येथील माध्यमिक विद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती व बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला.मुख्याध्यापक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात भारताचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. बालदिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच खेळांचे आयोजन करण्यात आले.मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पंडित नेहरू यांच्या दूरदृष्टी, आधुनिक भारत घडवण्यात त्यांच्या भूमिकेचे महत्व तसेच मुलांप्रती असलेल्या त्यांच्या प्रेमाचा उल्लेख केला. “बालकांमध्ये सृजनशीलता, विज्ञाननिष्ठा व राष्ट्रप्रेमाची भावना वाढीस लागावी,” असे आवाहनही त्यांनी केले.
शिक्षकांनीही मुलांना मार्गदर्शन करत विविध शैक्षणिक आणि प्रेरणादायी कथा सांगितल्या. प्रसंगी सूत्रसंचालन विनोद राणे तर आभार मंगल पावरा यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक योगेश पाटील, संजय पाटील, विनोद राणे, मंगल पावरा, फिरोजअली सय्यद, चांदो पाडवी, अनिल भामरे, सुवर्णा कोळी, विजय पवार, सागर पाडवी आदींनी परिश्रम घेतले.



