*लाखापूर फॉरेस्ट येथे धरती आबा बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लाखापूर फॉरेस्ट येथे धरती आबा बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी
*लाखापूर फॉरेस्ट येथे धरती आबा बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी*
तळोदा(प्रतिनिधी):-तालुक्यातील लाखापूर फॉरेस्ट येथील माध्यमिक विद्यालयात जननायक, क्रांतिकारक आणि आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान धरती आबा बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पांजली अर्पण करून करण्यात आले. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी, क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या कार्याचा स्मरण करत आदरांजली वाहिली. या प्रसंगी उपशिक्षक मंगल पावरा यांनी बिरसा मुंडा यांच्या अदम्य संघर्षाची, स्वातंत्र्य चळवळीतल्या त्यांच्या भूमिकेची तसेच जल- जंगल- जमीन या हक्कांसाठी त्यांनी चालवलेल्या उलगुलान आंदोलनाची माहिती विद्यार्थ्यांना सविस्तर दिली.
विद्यार्थ्यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर ग्रामीण व आदिवासी समाजातील तरुणांसाठी ते कसे प्रेरणादायी ठरतात यावर विशेष चर्चा घेण्यात आली. विद्यालयात देशप्रेम, समाजसेवा आणि आदिवासी संस्कृतीचे महत्त्व उपशिक्षक संजय पाटील यांनी पटवून दिले.मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “बिरसा मुंडा हे फक्त आदिवासी समाजाचे नव्हे तर संपूर्ण भारताचे आदर्श क्रांतिकारक आहेत. त्यांचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करून समाजोपयोगी कार्य करणे हीच खरी जयंती आहे.”
कार्यक्रम प्रसंगी शिक्षक, विद्यार्थी, पालक व स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी सूत्रसंचालन विनोद राणे तर आभार फिरोजअली सय्यद यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगेश पाटील, संजय पाटील,विनोद राणे,मंगल पावरा, चांदो पाडवी, फिरोजअली सय्यद, अनिल भामरे, सुवर्णा कोळी, विजय पवार, सागर पाडवी आदींनी परिश्रम घेतले.



