*तुळाजा येथे भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती उत्साहात साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*तुळाजा येथे भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती उत्साहात साजरी*
*तुळाजा येथे भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती उत्साहात साजरी*
तळोदा(प्रतिनिधी):-तळोदा तालुक्यातील माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे मुख्याध्यापक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने
भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी
जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष तुळाजा
गावाचे माजी उपसरपंच विक्रम
डूमकुळ होते, तर प्रमुख वक्ते युवा
कार्यकर्ते सचिन राहासे होते.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान
बिरासा मुंडा यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्याची
भाषणे केली. तसेच प्रमुख वक्ते सचिन यांनी भगवान बिरसा मुंडा
यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच
मुख्याध्यापक उमेश पाटील यांनी आधुनिक काळात यशस्वी जीवन जगायचे असेल तर शस्त्राची
नाही तर कलम अर्थात पेन हाती घेऊन लढावे लागेल असे सांगीतले.
यावेळी मगरे, मोरे, भील, पाडवी यांनी मनोगत व्यक्त केले.
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष विक्रम यांनी विद्यार्थ्यांना शिकून
खूप मोठे अधिकारी होऊन आपल्या
क्रांतिकारकांचे स्वप्न साकार करा असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना कलम अर्थात पेन
देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सूत्रसंचलन ढोडरे यांनी केले. तर आभार साळुंखे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
खेडकर, जांभोरे, राठोड, मोहन वळवी आणि सुबोध जावरे यांनी परिश्रम घेतले.



