*शा. ज. नटावदकर प्राथमिक विद्या मंदिरात बालदिन उत्साहात साजरा
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शा. ज. नटावदकर प्राथमिक विद्या मंदिरात बालदिन उत्साहात साजरा
*शा. ज. नटावदकर प्राथमिक विद्या मंदिरात बालदिन उत्साहात साजरा*
नंदूरबार(प्रतिनिधी):-शा.ज.नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात 14 नोव्हेंबर रोजी बाल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राथमिक विद्या मंदिराचे मुख्याध्यापक सुनील खैरनार, प्रणाली बोरकर व आजच्या प्रमुख वक्त्या अंकिता पाटील यांनी पंडित नेहरूजींच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. याप्रसंगी विद्यार्थ्यांची बालगीत व बडबड गीते गायनाची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धा ही दोन गटात घेण्यात आली. पहिली व दुसरी लहान गट, तिसरी व चौथी मोठा गट. लहान गटात प्रथम क्रमांक श्रेया प्रकाश भिसे इयत्ता पहिली, द्वितीय क्रिस्टी वकील पाटील इयत्ता दुसरी, तृतीय हेतल घनश्याम गवळे इयत्ता दुसरी, उत्तेजनार्थ सोनल कुंदन महाले, अस्मिता किशोर पाटील. मोठा गट प्रथम क्रमांक राम नरेश पानसरे, इयत्ता चौथी, द्वितीय पंकजा योगेश कापसे इयत्ता चौथी, स्वरा अतुल अग्निहोत्री इयत्ता तिसरी, तृतीय क्रमांक पार्थ योगेश भावसार इयत्ता तिसरी राजवी भावसार इयत्ता तिसरी. उत्तेजनार्थ जीनिशा नरेश चौधरी इयत्ता चौथी. स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या अंकिता पाटील यांनी पंडित नेहरूजीं विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तरुलता कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिपाली पाटील, रंजीता वळवी, मोनिका नेरे, मीनल पाटील, पुनम बागुल, दिव्या पवार, कविता ठाकरे, श्रीराम मगर, निलेश पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.



