*संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत बोकळझर, कळंबू ग्रामपंचायतींची तपासणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत बोकळझर, कळंबू ग्रामपंचायतींची तपासणी*
*संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत बोकळझर, कळंबू ग्रामपंचायतींची तपासणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत जिल्ह्यात प्रथम व द्वितीय आलेल्या अनुक्रमे बोकळझर ता. नवापूर व कळंबू ता. शहादा या ग्रामपंचायतींची जळगाव जिल्हा परिषदेचे जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने विभागस्तरीय तपासणी केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक आय. बी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. सन 2023- 24 या वर्षात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात नंदुरबार जिल्ह्यात बोकळझर ता. नवापूर या ग्रामपंचायतीने प्रथम तर कळंबू ता.शहादा या ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांक मिळवला आहे.शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्ह्यात प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतींची विभागस्तरीय तपासणी करण्यात येते. त्यानुसार जळगाव जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक राहुल जाधव, कनिष्ठ प्रशासन अधिकारी ऋषिकेश भदाणे, समाजशास्त्रज्ञ भीमराव सूरदास यांच्या समितीने दोन्ही गावांना भेटी देऊन तपासणी केली. यावेळी नवापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी देविदास देवरे, सहाय्यक गट विकास अधिकारी किरण गावित, शहादा पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी विकास राठोड, क्षमता बांधणी तज्ञ योगेश कोळपकर, समाजशास्त्रज्ञ कैलास कांजरेकर आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी समितीने ग्रामपंचायत अंतर्गत शाळा, अंगणवाडी तसेच सार्वजनिक ठिकाणी भेटी देऊन तेथील वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेची पाहणी केली. तसेच गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कामाची पाहणी केली. समितीचे अध्यक्ष राहुल जाधव यांनी उपस्थित ग्रामस्थांना अभियानाविषयी मार्गदर्शन करून गावातील स्वच्छतेची शाश्वतता कायम ठेवणे बाबत आवाहन केले.
याप्रसंगी बोकळझर सरपंच सौ. सुमन गावित, उपसरपंच अमित गावित, राहुल गावित, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश मावची, डॉ. अनिल वळवी सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी गणेश गावित तसेच कळंबू येथील सरपंच रामराव बोरसे, उपसरपंच हिरालाल देवरे, बांधकाम विभागाचे उप अभियंता पावरा, हरीश भोई, विस्तार अधिकारी बी. के. पाटील, उपभियंता महेंद्र नाईक गटशिक्षणाधिकारी योगेश साळवे, ग्रामपंचायत अधिकारी बी. ए. पाटील, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक आदिसह ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, स्वच्छतागृही कर्मचारी व कर्मचारी उपस्थित होते.



