*‘बाल दिना’निमित्त जिल्ह्यात बालकामगारांच्या उच्चाटनासाठी विशेष प्रयत्न-मधुरा सुर्यवंशी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*‘बाल दिना’निमित्त जिल्ह्यात बालकामगारांच्या उच्चाटनासाठी विशेष प्रयत्न-मधुरा सुर्यवंशी*
*‘बाल दिना’निमित्त जिल्ह्यात बालकामगारांच्या उच्चाटनासाठी विशेष प्रयत्न-मधुरा सुर्यवंशी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यात 14 नोव्हेंबर हा दिवस “बाल दिन” म्हणून साजरा करण्यात येत असून या निमित्ताने बालकामगारांच्या उच्चाटनासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती सरकारी कामकार अधिकारी मधुरा सुर्यवंशी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, नाशिक विभागाचे कामगार उप आयुक्त विकास माळी, आणि जळगांवचे सहाय्यक कामगार आयुक्त डॉ. राजू गुल्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बालकामगार उच्चाटनासाठी कडक पाऊले उचलण्याचे कार्य करण्यात येत असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व नागरिक, दुकाने, आस्थापना, हॉटेल्स, वीटभट्ट्या, खडीक्रशर, चहा टपऱ्या इत्यादी ठिकाणी 14 वर्षांखालील बालकांना आणि 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन कामगारांना धोकादायक उद्योगांमध्ये कामावर न ठेवण्याचे विशेष आवाहन करण्यात येत आहे. बालकामगार ठेवल्यास कठोर शिक्षेची तरतूद :
बालकामगार (प्रतिबंध व नियमन) सुधारणा अधिनियम, 2016 नुसार: 14 वर्षांखालील बालकांना कोणत्याही आस्थापनेत कामावर ठेवणे हा गुन्हा आहे. 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन कामगारांना धोकादायक उद्योग व प्रक्रियेतील आस्थापनेत कामावर ठेवणे हा फौजदारी गुन्हा आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या मालकांविरुद्ध कठोर शिक्षेची तरतूद आहे: शिक्षेचे स्वरूप: फौजदारी गुन्ह्यासाठी 6 महिने ते 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा रुपये 20 हजार ते रुपये 50 हजार पर्यंत दंड, किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. गुन्ह्याची पुनरावृत्ती: गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास 1 वर्ष ते 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा रुपये 10 हजार इतका दंड, किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकते. तातडीची कारवाई: बाल कामगारांची मालकाच्या छळातून त्वरित मुक्तता करून संबंधित पोलिस ठाण्यात मालकांविरुद्ध अटकेची त्वरित कार्यवाही केली जाते. शारीरिक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक शोषणाचे कारण :
बाल मजुरीमुळे बाल कामगारांचे शारीरिक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक शोषण होते. त्यामुळे बाल दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील बालकामगारांचे उच्चाटन करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, जर कोणास बालकास/किशोरवयीन बालकास कामावर ठेवल्याचे आढळल्यास, त्यांनी त्वरीत सरकारी कामगार अधिकारी, दाळवाले बिल्डिंग, जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी, अग्रवाल भवन समोर, धुळे दूरध्वनी क्रमांक 02562-283340 ई-मेल पत्ता glodhule@yahoo.com येथे संपर्क साधावा, असे आवाहनही सरकारी कामकार अधिकारी मधुरा सुर्यवंशी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.



