*जवाहर चौकातील एसटी पिकअपशेडमध्ये दोन दशकानंतर झळकला एसटीच्या वेळापत्रकाचा फलक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जवाहर चौकातील एसटी पिकअपशेडमध्ये दोन दशकानंतर झळकला एसटीच्या वेळापत्रकाचा फलक*
*जवाहर चौकातील एसटी पिकअपशेडमध्ये दोन दशकानंतर झळकला एसटीच्या वेळापत्रकाचा फलक*
राजापूर(प्रतिनिधी):-सततच्या पाठपुराव्यानंतर शहरातील जवाहर चौकातील एसटी बस पिकअप शेडमध्ये अखेर राजापूर एसटी आगाराने तालुक्यात जाणाऱ्या एसटी बसेसचे वेळापत्रक लावण्याची तसदी घेतली आहे. यासाठी गेले अनेक महिने उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहर संपर्क प्रमुख सत्यवान कदम यांनी पाठपुरावा सुरू ठेवलेला होता राजापूर शहरातून ग्रामीण भागात जाणाऱ्या सर्वच एसटी बसेस या जवाहर चौकातील पिकअपशेडमधून मार्गस्थ होतात. प्रत्यक्षात ही पिकअप शेड ही नगरपरिषदेच्या मालकीची आहे. गेली अनेक दशके जवाहर चौकातील ही पिकअपशेड या वाहतुकीची साक्षीदार आहे. सुमारे वीस वर्षांपूर्वी जवाहर चौक येथील ही पिकअप शेड जीर्ण झाल्याने तत्कालीन नगराध्यक्षा ॲड हुस्नबानू खलिफे यांनी तत्कालीन खा. सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून निधीची उपलब्धता करुन शेडचे नुतनीकरण केले होते व्यवसायाच्या दृष्टीने एस.टी. महामंडळाला लाभदायक असलेल्या या शेडमध्ये प्रत्यक्षात मात्र राजापूर आगाराचे दुर्लक्ष झालेले आहे या इमारतीत बरीच दशके एसटीचे तालुकावार वेळापत्रक नसल्याचे निदर्शनास आले असता राजापूर डेपो मॅनेजर यांच्याकडे सत्यवान कदम यांनी सततचा पाठपुरावा केल्यानंतर अखेर वेळापत्रकाचा फलक लावण्यात आला आहे. दरम्यान या कार्यवाही नंतर कदम यांनी एसटी आगाराला भेट देऊन आगारप्रमुखांना धन्यवाद दिले आहेत.



