*दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठान आयोजित साहित्य वितरण समारंभ थाटामाटात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठान आयोजित साहित्य वितरण समारंभ थाटामाटात संपन्न*
*दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठान आयोजित साहित्य वितरण समारंभ थाटामाटात संपन्न*
मुंबई(प्रतिनिधी):-मराठी साहित्य निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी दत्तात्रय कृष्ण सांडू प्रतिष्ठान चेंबूर यांच्या वतीने आयोजित केलेला पुरस्कार वितरण समारंभ प्रमुख पाहुणे विवेक फणसळकर निवृत्त पोलिस आयुक्त, कवी अशोक नायगावकर, सतीश सोळंकुरकर, रमेश म्हापणकर यांच्या उपस्थितीत रविवार 9 नोव्हेंबर 2025 रोजी स. 9.30 वाजता बालविकास संघ, गांधी मैदानाजवळ द.कृ. सांडू मार्ग चेंबूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला जळगाव, नागपूर, चंद्रपूर, कुडाळ, सांगली, सातारा, पुणे अशा दूरदूरच्या ठिकाणाहून अनेक पुरस्कार विजेते लेखक कवी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे विवेक फणसळकर यांची प्रतिष्ठानचे विश्वस्त आनंद सांडू यांनी घेतलेली मुलाखत विलक्षण रंगली.