*जिल्हा युवा साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात उद्घाटक विश्वास पाटील यांनी निमंत्रण स्वीकारले*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्हा युवा साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात उद्घाटक विश्वास पाटील यांनी निमंत्रण स्वीकारले*
*जिल्हा युवा साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात उद्घाटक विश्वास पाटील यांनी निमंत्रण स्वीकारले*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील श्रीजी वाचनालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय युवा साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. संमेलनाचे उद्घाटक विश्वास पाटील यांच्यासह प्रमुख अतिथी डॉ.नरेंद्र पाठक, परिसंवादाच्या प्रमुख वक्त्या सौ.निकीता भागवत, गीतेश शिंदे आदींनी निमंत्रण स्विकारले आहे. तसेच साहित्य आणि संस्कृती मंडळाचे प्रतिनिधी, संमेलनाध्यक्ष म्हणून जेष्ठ साहित्यिक प्रभाकर भावसार उपस्थित राहणार आहेत. येथील श्रीजी सार्वजनिक वाचनालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दि.16 नोव्हेंबर रोजी जिल्हा युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषा विभाग महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या अनुदानातून होत असलेल्या या संमेलनामुळे नंदुरबार जिल्हयातील युवा साहित्यीकांना विशेष प्रोत्साहन मिळणार आहे. या युवा साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, साहित्यिक परिसंवाद, कविसंमेलन अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी नंदुरबारकर साहित्य प्रेमींना मिळणार आहे. 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता हुतात्मा स्मारक माणिक चौक येथून दिंडीस प्रारंभ होईल. संमेलनाचे उद्घाटन सत्र 11 वाजता सुरू होणार आहे. या संमेलनात प्रसिद्ध कादंबरीकार व अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष व कादंबरीकार विश्वास पाटील यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. साहित्य अकादमी दिल्लीचे सदस्य डॉ. नरेंद्र पाठक, युवा साहित्यिक प्रविण पवार, संमेलनाध्यक्ष म्हणून जेष्ठ साहित्यिक प्रभाकर भावसार आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
दुपारी 2 वाजता परिसंवाद, 4 वाजता समारोप सत्र व त्यानंतर कविसंमेलन असे विविध कार्यक्रम होणार आहेत. संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, लोगो स्पर्धा घेण्यात आली. संमेलन स्थळाला संत गुला महाराज नगरी, ग्रंथ विक्री स्टॉलला जेष्ठ साहित्यिक स्व. पितांबर सरोदे कक्ष, प्रदर्शनीय कक्षाला भगवान बिरसा मुंडा दालन, भोजनकक्षाला संत दगा महाराज कक्ष तर मुख्य सभागृहाला जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्व.रमेशभाई शाह यांचे नांव देण्यात आले आहे. या संमेलनास जिल्ह्यातील विशेषतः युवा साहित्यिकांसह सर्व साहित्य प्रेमींनी आवर्जून पूर्ण दिवस उपस्थित रहावे असे आवाहन स्वागताध्यक्ष संदीप चौधरी, संयोजक शशिकांत घासकडबी, कार्याध्यक्ष रमाकांत पाटील, व्यवस्था प्रमुख दीपक कुळकर्णी तसेच सर्व संचालन समिती सदस्य स्वागत समिती सदस्यांनी केले आहे.



