*सार्वजनिक गुजराती हायस्कूलचा खेळाडू जयेश गोसावी याची राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेसाठी निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सार्वजनिक गुजराती हायस्कूलचा खेळाडू जयेश गोसावी याची राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेसाठी निवड*
*सार्वजनिक गुजराती हायस्कूलचा खेळाडू जयेश गोसावी याची राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेसाठी निवड*
नवापूर(प्रतिनिधी):–दि नवापूर एज्युकेशन सोसायटी संचलित दि एन.डी. अँड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच.जे.शाह कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता 10 वी तील खेळाडू विद्यार्थी जयेश गोसावी याची पाटन (गुजरात) येथे होणाऱ्या 10 व्या राष्ट्रीय सब- ज्युनिअर डॉजबॉल स्पर्धेसाठी निवड झाली असून, या उल्लेखनीय कामगिरीमुळे शाळेसह नवापूर शहराचा अभिमान वाढला आहे.
महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशन व पिंपरी-चिंचवड डॉजबॉल असोसिएशन यांच्या विद्यमाने हिंदुस्तान अँटिबायोटिक स्कूल, पिंपरी- चिंचवड येथे 26 ते 28 ऑक्टोबर 2025 दरम्यान 15 वी सब-ज्युनिअर मुले व मुली राज्यस्तरीय डॉजबॉल अजिंक्यपद स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्याचा संघ उत्साहाने सहभागी झाला होता. नवापूर येथील दि एन.डी. अँड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूलचे तब्बल 12 खेळाडू विद्यार्थी या संघात होते. स्पर्धेच्या सुरुवातीलाच नंदुरबार जिल्ह्याच्या संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत मागील वर्षीचा उपविजेता सोलापूर ग्रामीण संघाला 6- 0 ने पराभूत करून सर्वांचे लक्ष वेधले. त्यानंतर पालघर (8–6) व अमरावती (6–2) संघांवरही नंदुरबारने विजय मिळवला. मात्र बीड, अहमदनगर व मुंबई शहर संघांविरुद्ध थोडक्यात पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेत जयेश गोसावीने अचूक फेक, वेगवान हालचाल व टीमवर्क यांच्या जोरावर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावरच त्याची 14 ते 17 नोव्हेंबर 2025 दरम्यान पाटन (गुजरात) येथे होणाऱ्या 10 व्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेसाठी निवड झाली. जयेशच्या खेळामागे शाळेचे क्रीडा शिक्षक निलेश गावंडे व श्रीकांत पाटील यांचे परिश्रम व मार्गदर्शन ठरले. जयेशच्या या यशाबद्दल दि नवापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विपिन चोखावाला, उपाध्यक्ष शिरीष शाह, कार्याध्यक्षा शितल वाणी, सचिव राजेंद्र अग्रवाल, सहसचिव शोएब मांदा, कोषाध्यक्ष सतीश शाह तसेच व्यवस्थापन मंडळातील सर्व सदस्यांनी अभिनंदन केले. तसेच महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे महासचिव हनुमंत लुंगे, शाळेचे मुख्याध्यापक संजयकुमार जाधव, उपमुख्याध्यापिका श्रीमती कमल परिख, उपप्राचार्य नरेंद्र पाटील, पर्यवेक्षिका निर्जला सोनवणे व पर्यवेक्षक जाहीद खान पठाण यांनी अभिनंदन केले.
“जयेशने शिस्त, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. त्याच्याकडून राष्ट्रीय स्तरावरही उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे,” संजय कुमार जाधव.



