*माध्यमिक विद्यालय लाखापूर येथे शुगर बोर्ड फलक अनावरण*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*माध्यमिक विद्यालय लाखापूर येथे शुगर बोर्ड फलक अनावरण*
*माध्यमिक विद्यालय लाखापूर येथे शुगर बोर्ड फलक अनावरण*
तळोदा(प्रतिनिधी):-तालुक्यातील लाखापूर फॉरेस्ट येथील माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक योगेश पाटील यांच्या हस्ते शुगर बोर्ड फलक अनावरण करण्यात आले. त्या अनुषंगाने विद्यालयात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या साखरयुक्त पदार्थाच्या अतिसेवनामुळे उद्भवणाऱ्या दीर्घकालीन धोक्याबाबत चर्चासत्रातून मार्गदर्शन करण्यात आले. साखरयुक्त पदार्थांपासून वाढते आरोग्याचे संकट
नागरिकांमध्ये आरोग्य जागरूकतेची गरज
अलीकडच्या काळात साखरयुक्त पदार्थांचे अतिसेवन हे अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण करणारे ठरत आहे. विशेषतः मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटांमध्ये चॉकलेट, कोल्डड्रिंक, केक, मिठाई, गोड पेये अशा पदार्थांचे प्रमाण वाढल्याने मधुमेह, स्थूलता (लठ्ठपणा), दातांची हानी, हृदयविकार तसेच मानसिक अस्थिरता या समस्या वाढताना दिसत आहेत.
आरोग्य तज्ञांच्या मते, शरीराला ऊर्जेसाठी आवश्यक असलेली साखर नैसर्गिक पदार्थांमधून जसे फळे, दूध, धान्य मिळवावी, कृत्रिमरीत्या वाढवलेली साखर टाळावी. अनेक अभ्यासानुसार रोजच्या आहारात साखरेचे प्रमाण 25 ग्रॅमपेक्षा अधिक नसावे, असे WHO ने सुचविले आहे.
दुष्परिणाम,
मधुमेहाचा धोका वाढतो,
लठ्ठपणामुळे हृदयविकाराची शक्यता वाढते,
दातांमध्ये कीड आणि नुकसान
ऊर्जा क्षीण होऊन थकवा आणि चिडचिडेपणा वाढतो,
त्वचेवरील दुष्परिणाम पिंपल्स, वृद्धत्वाची लवकर लक्षणे, उपाययोजना.
साखरेऐवजी नैसर्गिक पर्याय वापरा गूळ, मध, खजूर यांचा वापर करा. पाणी व फळांच्या रसांचा वापर वाढवा, कोल्डड्रिंक टाळा.
नियमित व्यायाम आणि संतुलित आहार ठेवा.
पॅकबंद पदार्थांचे लेबल वाचा आणि साखरेचे प्रमाण तपासा. साखरेचा अतिरेक आरोग्यास गोड नसून घातक ठरतो, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आरोग्यदायी जीवनासाठी साखरेवरील नियंत्रण हीच खरी गोडी आहे.
यावेळी विद्यार्थी आणि पालक साखरयुक्त पदार्थांच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणाम बाबत चर्चेतून पालकांना विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. यावेळी पालक विद्यार्थी आणि शिक्षकांच्या उस्फूर्त सहभागात दिसून आला. शुगर बोर्ड उपक्रमांतर्गत माऊंट बोर्ड, फलक लेखन, करावयाच्या गोष्टी टाळायच्या गोष्टी याबाबत सूचना दर्शक फलक, इत्यादी लावून विद्यार्थी आणि पालकांनी सदर बोर्डची पाहणी करून माहिती जाणून घेतली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक योगेश पाटील, संजय पाटील, विनोद राणे, मंगल पावरा, चांदो पाडवी, फिरोजअली सय्यद, अनिल भामरे, विजय पवार, सागर पाडवी आदींनी परिश्रम घेतले.



