*"सम्राट अशोक" काव्य व कलारत्न पुरस्काराने अरुण द. म्हात्रे सन्मानित*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*"सम्राट अशोक" काव्य व कलारत्न पुरस्काराने अरुण द. म्हात्रे सन्मानित*
*"सम्राट अशोक" काव्य व कलारत्न पुरस्काराने अरुण द. म्हात्रे सन्मानित*
मुंबई(प्रतिनिधी):-सम्राट अशोक साहित्य व सांस्कृतिक मंच लातूर, महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय कवी संमेलन, पुस्तक प्रकाशन व निवडक मान्यवरांचा पुरस्कार वितरण सोहळा दि. 31 ऑक्टोबर 2025 रोजी लातूर येथील मयुरा सभागृह, फंक्शन हॉल येथे संपन्न झाला. सदर पुरस्कार सोहळ्यास संस्थेकडून राज्याच्या विविध भागांतील विविध क्षेत्रातील गुणिजन पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली होती. यामध्ये साहित्य, कला, सांस्कृतिक तसेच सामाजिक क्षेत्रात अनमोल योगदान देणारे जासई- उरण- रायगडचे अरुण द. म्हात्रे. यांची निवड "काव्य व कलारत्न" पुरस्कारासाठी करण्यात आली.
म्हात्रे यांना संस्थेचे अध्यक्ष, कार्यक्रमाध्यक्ष आणि उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन "सम्राट अशोक काव्य व कलारत्न पुरस्कार- 2025" ने आदरपूर्वक गौरविण्यात आले.
कवी संमेलनात सारस्वतांनी विविध विषयांच्या रचना सादर केल्या. त्यामध्ये कवी/गायक म्हात्रे यांनी सुरांचा बादशहा स्व. मो. रफी यांच्यावर आधारित रचलेले- "यादगार मोहम्मद रफी" हे काव्य-गीत सुमधुर आवाजात गाऊन उपस्थितांची मने जिंकली. राज्यस्तरीय कवी संमेलन, पुरस्कार वितरण आणि पुस्तक प्रकाशन असा त्रिवेणी संगम असलेला हा कार्यक्रम आनंदात पार पडला.



