*फुपेरे भोवडवाडीतील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल रखुमाई मंदिरात"भक्तीच्या सुरांनी गुंजला कार्तिकी एकादशीचा सोहळा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*फुपेरे भोवडवाडीतील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल रखुमाई मंदिरात"भक्तीच्या सुरांनी गुंजला कार्तिकी एकादशीचा सोहळा*
*फुपेरे भोवडवाडीतील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल रखुमाई मंदिरात"भक्तीच्या सुरांनी गुंजला कार्तिकी एकादशीचा सोहळा*
राजापूर(प्रतिनिधी):-प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी राजापूर तालुक्यातील फुपेरे भोवडवाडीतील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात कार्तिकी एकादशी महोत्सव मोठ्या भक्तीभावात, हरीनामाच्या गजरात साजरा करण्यात आला, या कार्यक्रमाचे नियोजन भोवडवाडी उत्कर्ष मंडळ मुंबई व ग्रामीण कार्यकर्त्यांनी सुंदर रित्या पार पाडले. सकाळी ढोल ताशांच्या वाजंत्री सोबत विठ्ठल नामाच्या गजरात वारकरी दिंडी सोहळा पार पडला. पूजापाठ, आरती नंतर महिलांसाठी हळदीकुंकू तसेच दर्शनासाठी येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना वह्या पेन पेन्सिल भेट देण्यात आली. दिवसभरात राजापूर तालुक्यातील असंख्य भाविकांनी, तसेच विविध राजकीय, तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी दर्शन घेतले. दुपारी सौ. लक्ष्मी शांताराम भोवड व सहकारी यांचा हरिपाठ कार्यक्रम पार पडला, तर दुपार नंतर पंचक्रोशीतील वारकरी भाजनांचा सुंदर सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी मंडळाचे कार्याध्यक्ष नामदेव भोवड, सल्लागार शांताराम भोवड यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव समिती सदस्य प्रणित भोवड, किरण भोवड, दिनेश भोवड, धनंजय भोवड, मनोज भोवड, राजकुमार दिवाळे, सह मंडळाच्या सर्वच सभासद, पदाधिकारी व ग्रामस्थानी खूप मेहनत घेऊन कार्यक्रम नियोजनबद्ध पार पाडला.