*दरोडयाच्या पुर्वतयारीत असणारे इसम तालुका पोलीसांच्या ताब्यात, 2 आरोपी व 1 अल्पवयीन बालक, एकुण 1 लक्ष 30 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दरोडयाच्या पुर्वतयारीत असणारे इसम तालुका पोलीसांच्या ताब्यात, 2 आरोपी व 1 अल्पवयीन बालक, एकुण 1 लक्ष 30 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत*
*दरोडयाच्या पुर्वतयारीत असणारे इसम तालुका पोलीसांच्या ताब्यात, 2 आरोपी व 1 अल्पवयीन बालक, एकुण 1 लक्ष 30 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत*
नंदुरबार(प्रतिनिधी):-चोरी, जबरी चोरी, दरोडा यासारखे प्रकारांना आळा बसावा या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस यांनी जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आपआपले हद्दीत वेळोवेळी नाकाबंदी व नियमित गस्त घालणेबाबतच्या वेळोवेळी सुचना केल्या आहेत.
त्याअनुषंगाने 3 नोव्हेंबर 2025 रोजी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे प्रभारी दिनेश भदाणे यांचे आदेशान्वये तालुका पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलेले बीट अंमलदार हे शासकीय वाहनाने हद्दीत गस्त करीत असतांना भोणे गावाचे पुढे व चाकळे गावाचे दरम्यान रोडवर दुपारचे सुमारास दोन मोटारसायकल लावलेल्या होत्या. त्यामध्ये रस्त्याचे कडेला लावलेल्या एका मोटारसायकल वर दोन इसम बसलेले दिसून आले व इतर तिन इसम हे मोटरसायकल उभी करुन फॉरेस्टचे जागेत रोडचे बाजुला दबा धरुन बसलेले दिसले, त्यांचेपैकी एकाचे हातात बॅग दिसुन आली. सदर इसमांचा पोलीसांना संशय आल्याने पोलीसांनी वाहन थांबविले असता सदर इसमांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता मोटरसाकलवर बसलेले 2 इसम तेथून फरार झाले, व दबा धरुन बसलेल्यापैकी 3 इसमांना पकडण्यात आले असता त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे अनुक्रमे राजेश शंकीलाल पवार, वय 32 वर्षे, रा. जामदा ता. साक्री जि. धुळे, विष्णू गुणवंत भोसले, वय- 33 वर्षे, रा. जामदा ता. साक्री जि.धुळे (विधीसंघर्षग्रस्त बालक) अशांना नमुद जागेवर येण्याचे कारणाबाबत विचारणा करता ते उडवाउडवीचे असंबंध्द अशी उत्तरे देऊ लागले. त्यावरुन पोलीसांना त्यांचेवर अधिकचा संशय बळावल्याने सदर इसमांचे ताब्यात असलेल्या बॅगची तपासणी करता त्यामध्ये दरोडा टाकणेकामी आवश्यक असलेले एकुण 1 लक्ष 30 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला आहे. मिळालेल्या साहित्याचे अनुषंगाने सदर राजेश पवार व विष्णू भोसले यांना अधिकचे विश्वासात घेऊन विचारपूस करता त्यांनी सांगितले की, ते बाहेरील राज्यातुन तसेच इतर जिल्हयातील नागरिकांना विविध प्रकारचे लोभ (त्यामध्ये चिल्ड्रेन बँकेच्या नोटा, अमरवेल, मॅगनेट, तसेच चमत्कारी मणी) असे लालच दाखवून त्यांची फसवणूक करुन येथे बोलावून हत्याराचा धाक दाखवुन त्यांची लुटमार करतात, याच हेतुने ते आज सर्व साहित्यानिशी दरोडयाचे पूर्व तयारीने येथे आले असल्याची त्यांनी कबूली दिली आहे. त्याअन्वये सदर इसमांवर नंदुरबार तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 381/2025 भा. न्या. संहिता कलम 310(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील अधिक तपास सुरु आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, नंदुरबार शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी दिनेश भदाणे, पोउपनि सुनिल भामरे, पोहेकों/विनायक सोनवणे, राजेंद्र धनगर, पोकों/अरुण चव्हाण, समाधान बोरसे, चापोकॉ सुभाष राठोड अशांनी केली आहे.



