*अक्कलकुवा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चाप्टर केस न करण्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपयाची लाच स्वीकारताना,पोलिस हवलदार शैलेश विजयसिंह गावित यास अटक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अक्कलकुवा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चाप्टर केस न करण्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपयाची लाच स्वीकारताना,पोलिस हवलदार शैलेश विजयसिंह गावित यास अटक*
*अक्कलकुवा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चाप्टर केस न करण्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपयाची लाच स्वीकारताना,पोलिस हवलदार शैलेश विजयसिंह गावित यास अटक*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला, धुळे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चाप्टर केस न करण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती दोन हजार रुपयाची लाच स्वीकारताना, पोलिस हवलदार शैलेश विजयसिंह गावित यास अटक केल्याने, अक्कलकुवा पोलीस दलासह, नंदुरबार पोलीस दलातील लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदाराच्या भावाविरोधात महिलेने तक्रार दिल्याने 1 ऑक्टोबर 2025 रोजी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात एनसी केस दाखल करण्यात आली होती, एनसी प्रकरणाची चौकशी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र जाधव यांनी केल्यानंतर, चाप्टर केस न करण्यासाठी जाधव यांनी त्यावेळी तीन हजार रुपये स्वीकारले होते, त्यानंतर तक्रारदार हे पोलीस ठाण्याजवळून जात असताना, संशईत शैलेश विजयसिंग गावित यांची भेट झाली, व त्याने यापूर्वी तू फक्त तीन हजार रुपये दिले आहेत, व अजून तीन हजार रुपये लागतील व पैसे न दिल्यास चॅप्टर केस दाखल करून त्याला अटक करू असा दम दिला, तक्रारदाराने लाचे बाबत धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दूरध्वनीद्वारे कळून, तक्रार दिल्यानंतर लाच पडताळणी दरम्यान, अक्कलकुवा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार शैलेश विजयसिंह गावित यांनी तडजोडीअंती अडीच हजार रुपये स्वीकारले असल्याचे मान्य केले, व सापळा दरम्यान दोन हजार रुपयाची लाच स्वीकारताच पथकाने शैलेश गावित यास अटक केली आहे, सदरची कारवाई धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात, पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, हवलदार राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, कॉन्स्टेबल मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सागर शिर्के, हवालदार सुधीर मोरे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला आहे, या घटनेचा सखोल तपास नंदुरबार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे करीत आहे.