*राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नंदुरबारात 1 नोव्हेंबरला जिल्हा संघ निवड चाचणीचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नंदुरबारात 1 नोव्हेंबरला जिल्हा संघ निवड चाचणीचे आयोजन*
*राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नंदुरबारात 1 नोव्हेंबरला जिल्हा संघ निवड चाचणीचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेतर्फे राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी 1 नोव्हेंबर 2025 रोजी नंदुरबार येथे जिल्हा संघ निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन व सांगली जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या वतीने इस्लामपूर (ता.वाळवा जि.सांगली) येथे दि.13 ते 16 नोव्हेंबर 2025 दरम्यान पुरुष आणि महिला वरिष्ठ गटासाठी राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्ह्याचा खुल्या गटातील पुरुष व महिला संघ सहभागी होणार आहे. त्यासाठी जिल्हा संघ निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. नंदुरबार येथील अभिनव विद्यालयात 1 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी नऊ वाजता जिल्हा संघ निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या निवड चाचणी स्पर्धेत निरीक्षक म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील प्रतिनिधी तसेच नंदुरबार जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे निवड समिती प्रमुख शिवछत्रपती पुरस्कारार्थी बळवंत निकुंभ, जगदीश पाटील हे असतील. खेळाडूंनी निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नंदुरबार निवड समिती प्रमुख योगेश निकुंभ (मो.9764227116), धनराज अहिरे (मो.8888440729) यांच्याशी संपर्क साधावा. या निवड चाचणीत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन नंदुरबार जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष डॉ.सुहास नटावदकर, उपाध्यक्ष डॉ.विजय पाटील, उपाध्यक्ष प्रा.डॉ.ईश्वर धामणे, सचिव बळवंत निकुंभ, अभिनव विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा. तारकेश्वर पटेल आदींनी केले आहे.



