*नंदुरबार जिल्हयाचे नाव अतिवृष्टीच्या यादीमध्ये समाविष्ठ करण्याबाबत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना निवेदन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्हयाचे नाव अतिवृष्टीच्या यादीमध्ये समाविष्ठ करण्याबाबत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना निवेदन*
*नंदुरबार जिल्हयाचे नाव अतिवृष्टीच्या यादीमध्ये समाविष्ठ करण्याबाबत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना निवेदन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्हयाचे नाव अतिवृष्टीच्या यादीमध्ये समाविष्ठ करण्याबाबतचे विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे.
राज्यचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संपुर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी झालेली असुन, नंदुरबार जिल्हयामध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. केळी, पपई, कापूस मका, सोयाबीन आदी पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमध्ये पाळीव प्राणी व घरांचे, गुरांच्या गोठयांचे सुध्दा नुकसान झालेले आहे. महाराष्ट्र शासनाने नुकतीचे ओला दुष्काळासाठी शेतकऱ्यांना मदत जाहीर केलेली आहे. परंतु त्या यादीमध्ये नंदुरबार या आदिवासी जिल्हयाचे नांव वगळयात आले आहे. तरी महाराष्ट्र शासनाच्या ओला दुष्काळाचा यादी मध्ये नंदुरबार जिल्हयाचा समावेश करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.