*किशोर प्रेमींनी जागवल्या किशोरकुमारांच्या आठवणीं*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*किशोर प्रेमींनी जागवल्या किशोरकुमारांच्या आठवणीं*
*किशोर प्रेमींनी जागवल्या किशोरकुमारांच्या आठवणीं*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहरातील किशोर कुमार प्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात 'एक शाम किशोर कुमार के नाम' या कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना आदरांजली वाहिली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, डी वाय एस पी संजय महाजन, नंदुरबार तालुका विधायक समिती उपाध्यक्ष व उद्योगपती मनोज रघुवंशी, लायन्स क्लब झोन चेयरमन सतीश चौधरी, छाया संगीत विद्यालयच्या संचालिका सौ सुनीता चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमात सुरुवातीला दिपप्रज्वलन, प्रतिमा पूजन करण्यात आले. यानंतर चंद्रशेखर चव्हाण यांच्या संकल्पनेतून पुढे आलेला कार्यक्रमात सादर झाला. यात किशोर कुमार यांनी अजरामर केलेली अनेक गीते सादर झाली. यात निले निले अंबर पर, ओ साथी रे, परदेसीया, दिये जलते हैं, करवटे बदलते हैं, बडी सुनी सुनी हैं, जाने ज, मेरे मेहबूब कयामत होगी, अश्विनी ये ना, नखरेवाली, चिंगारी, वादा तेरा वादा, सलामे इश्क, ईस मोडसे जाते हैं, शोखियों में घोला जाए, कोरा कागज था मन मेरा, देखा एक खाब, मॅच गया शोर, सॅड सोंग मेलडी व शेवटी हॅपी सॉंग मेलडी सादर होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
संयोजक चंद्रशेखर चव्हाण, डॉ दीपक अंधारे, डॉ राजेश कोळी, डॉ पंकज पटेल, शेखर कोतवाल, सौ दीपा वाडेकर, सौ चेतना पाटील, सौ शुभांगी देवकर, रेवती (शहादा) यांनी सादर केली. या कार्यक्रमात विलास चौधरी यांनी किशोरकुमार यांच्या काही आठवणी 10 फ्लेक्स बनवून नाट्यगृहात लावली होती. या कार्यक्रमचे सूत्र संचालन व आभार श्रीराम दाउतखाने व सर्व गाण्यांचे माहिती पूर्ण निवेदन सौ चेतना चौधरी व किरण दाभाडे यांनी केले. या कार्यक्रमास रसिकानी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली.