*देवरे विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण समारंभ संपन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*देवरे विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण समारंभ संपन्न*
*देवरे विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण समारंभ संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुक्यातील आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष कै.आत्माराम धवळू देवरे यांच्या तेराव्या पुण्यतिथी निमित्ताने विद्यालयात लोकवर्गणीतून जल कुंभाचे लोकार्पण, वार्षिक बक्षीस वितरण समारंभ तसेच विद्यार्थी पालक शिक्षक मिळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी धंगाई विधायक कार्य मंडळ, म्हसदी ता. साक्री जि.धुळेचे अध्यक्ष राजेंद्र आत्माराम देवरे तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. रमेश चौधरी, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार, ज्येष्ठ संचालिका अनुसयाबाई आत्माराम देवरे, शोभना दिलीप साळुंके, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शैलजा राजेंद्र देवरे, वर्षा नरेंद्र देवरे, मुख्याध्यापिका, गंगामाता कन्या विद्यालय म्हसदी, माजी विद्यार्थी पोलीस उप निरीक्षक विनोद ज्ञानेश्वर पाटील शहर पोलीस स्टेशन शहादा, माजी विद्यार्थी प्रवीण वसंत पाटील सामाजिक, राजकीय कार्यकर्ते शनिमांडळ प्रमुख मार्गदर्शक वक्ते ॲड. इंजि.गजानन पाटील, प्रा.संजय पाटील समन्वयक, जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन संघ, नंदुरबार, पालक निंबा पाटील, विखरण येथील सरपंच भारती केशव पाटील, संचालक वेडू खेरणार, पुंजाराम पाटील,
विनायक देवरे, शिवाजी खैरनार, सुरेखा देवरे मुख्याध्यापिका जि. प.शाळा, विखरण, सुशीला पाटील यांच्या उपस्थितीत संस्थापक अध्यक्ष स्व. आत्माराम धवळू देवरे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन झाल्यानंतर माजी विद्यार्थी कै.माहेश्वर निंबा पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्याचे पालक निंबा पाटील यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी लोकवर्गणीद्वारे जल कुंभाची उभारणी केली. सदर पालक व मान्यवरांच्या हस्ते या जल कुंभाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविकासह अहवाल वाचन विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी.साळुंके यांनी केले. विद्यार्थ्यांनी विविध गीते सादर केली. विद्यार्थ्यांनी संस्थापक अध्यक्ष आत्माराम धवळू देवरे यांच्या जीवन कार्याचा परिचय, विद्यालयातील विविध उपक्रम आपल्या मराठी, इंग्रजी,हिंदी व अहिराणी भाषणाद्वारे दिला. विद्यालयातील मागील वर्षी एस. एस.सी.बोर्ड परीक्षेतून, एन.एम. एम.एस, सारथी शिष्यवृत्ती पात्र उच्च प्राथमिक गटातून शिष्यवृत्ती पात्र, पूर्व माध्यमिक गटातून शिष्यवृत्ती पात्र, गणित अध्यापक मंडळ आयोजित संबोध व प्राविण्य परीक्षेतील उत्तीर्ण, राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील उत्तीर्ण, महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा पुणे शिष्यवृत्ती पात्र, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अंतर्गत इंग्रजी परीक्षेतील उत्तीर्ण, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेतील इंटरमिजिएट एलिमेंट्री परीक्षेतील ए श्रेणी तील पात्र, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक व क्रीडा विभागांतर्गत कला महोत्सवातील नंदुरबार जिल्ह्यातून प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा वरील मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन यशस्वितांना गौरविण्यात आले. उपशिक्षक डी.बी. भारती लिखीत गीताच्या चालीवर शाळेचे महत्व अधोरेखित करणारे गीत दहावी वर्गातील देवर्षी पाटीलने मधुर आवाजाने सादर करत आपल्या मराठी भाषणातून उपस्थितांची मने जिंकली व रोख स्वरूपात अनेक बक्षीस तिला प्रदान करण्यात आली. जितेंद्र पाटील व तनुषा पाटील यांनी अहिराणी भाषेतून सुसंवादाद्वारे विद्यालयातील उपक्रमांची माहिती व पालकांना प्रबोधन मार्मिक व विनोदी शैलीने केले. कृष्णा पाटील यांने इंग्रजीतून भाषणाद्वारे शाळेची कार्यशैली व्यक्त केली. हिंदीतून भावेश पानपाटील यांने स्वर्गीय आत्माराम देवरे यांच्या म्हसदी व विखरण येथील शैक्षणिक कार्याचा लेखाजोखा हिंदीमधून अनेक शेरोशायरीद्वारे मांडत उपस्थितांना प्रेरित केले. माजी विद्यार्थी पी.एस. आय. विनोद पाटील यांनी मी कसा घडलो हे विद्यालयीन जीवनातील अनुभवांद्वारे संघर्षातून समृद्धीकडचा प्रवास आपल्या मनोगतातून मांडला. प्रमुख व्याख्याते गजानन पाटील यांनी 'शिवाजी महाराज विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणा स्रोत' या विषयावर शिवाजी महाराजांच्या जीवनावर ऐतिहासिक पार्श्वभूमीवर विविध दाखले देत विद्यार्थ्यांना, पालकांना, मान्यवरांना खिळवून ठेवले. सोबतच विद्यालयातील साडे अकराशे वृक्षांची शिस्तबद्ध लागवड पाहून विविध उपक्रम यांची दखल घेऊन त्यांचे कौतुक आपल्या व्याख्यानातून केले. शालेय समितीच्या अध्यक्षा शैलजा देवरे यांनी विद्यालयाला 2023-24 मध्ये नंदुरबार तालुक्यातून 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' उपक्रमाद्वारे आदर्श शाळा म्हणून द्वितीय क्रमांकाचे रुपये दोन लाखाचे पारितोषिक प्राप्त झाले तसेच 2024-25 टप्पा दोन मध्ये नंदुरबार तालुक्यातून प्रथम क्रमांकाचे रुपये तीन लाखाचे बक्षीस प्राप्त झाले. तसेच राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व विद्यालयाचा दीपेश लोहार यांने केले. विविध यशोदायी उपक्रमांचे कौतुक आपल्या भाषणातून केले. नंदुरबार डी. आय.सी.पी.डी.चे प्राचार्य डॉ.रमेश चौधरी यांनी समारंभातील विविध घटनांचे कौतुक करत अहिराणी व इंग्रजी भाषेतील विद्यार्थ्यांचे भाषण प्रेरणादायी होते तसेच सर्व गीते मधुर होती. शालेय परिसर हरितमय असण्यात मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक व अभिनंदन आपल्या भाषणातून केले व विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून जीवनात यशस्वी होण्याची आव्हान केले. अध्यक्षीय भाषणातून राजेंद्र देवरे यांनी पालकांनी अधिकाधिक सहभाग वाढवून विद्यालयाच्या प्रगतीमध्ये हातभार लावण्याचे आवाहन केले. विद्यालयाच्या परंपरेनुसार असाच शैक्षणिक आलेख वाढवत ठेवण्याचे आवाहन मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.बी. भारती, एस.एच. गायकवाड,सी.व्ही.नांद्रे यांनी तर आभार वाय.डी. बागुल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीते साठी एम.डी.नेरकर, एम.एस. मराठे,ए. एस.बेडसे,व्ही.बी. अहिरे, डी.बी. पाटील, एस.जी. पाटील, एच.एम. खैरनार यांनी परिश्रम घेतले.