*अकरावी विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी, अर्ज सादर करण्यास 23 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ-पी.आर.कोसे*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अकरावी विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी, अर्ज सादर करण्यास 23 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ-पी.आर.कोसे*
*अकरावी विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी, अर्ज सादर करण्यास 23 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ-पी.आर.कोसे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जवाहर नवोदय विद्यालय श्रावणी, येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी इयत्ता अकरावी विज्ञान शाखेतील रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज सादर करण्यास 23 सप्टेंबर, 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती जवाहर नवोदय विद्यालय, श्रावणीचे प्राचार्य पी. आर. कोसे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
उत्कृष्ट शिक्षण आणि निवासी सुविधा, भोजन सुविधा, आधुनिक प्रयोगशाळा आणि डिजिटल शिक्षण, खेळ आणि कला क्षेत्रात संधी, शैक्षणिक गुणवत्ता आणि सर्वांगीण विकासाची खात्री, कौशल्य शिक्षण, अनुभवी शिक्षक व ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी अशी या विद्यालयाची वैशिष्ट्ये आहेत.
पात्रता: उमेदवार नंदुरबार जिल्ह्यातील (फक्त नवापूर व नंदुरबार) शासकीय मान्यताप्राप्त शाळेतून शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये दहावी उत्तीर्ण असावा. दहावीमध्ये सीबीएसई किंवा महाराष्ट्र राज्य बोर्डमध्ये विज्ञान आणि गणित विषयात किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. विद्यार्थ्यांचा जन्म 01 जून 2008 पूर्वी आणि 31 जुलै 2010 नंतर झालेला नसावा (दोन्ही दिवस समाविष्ट). ही अट अनुसूचित जाती, जमाती आणि इतर सर्व उमेदवारांसाठी लागू आहे. अनुसूचित जाती, जमाती, अपंग संवर्ग, इतर मागास वर्ग आणि तृतीयपंथी उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
अर्ज प्रक्रिया:
अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करता येणार असून ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, नवोदय विद्यालयाच्या या अधिकृत वेबसाइटवर
https://www.navodaya.gov.in/nvs/nvs-school/NANDURBAR-2/en/about_us/About-JNV/. लिंक उपलब्ध आहे ऑनलाइन अर्ज भरणे विनामूल्य आहे. अर्जासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, फोटो, विद्यार्थ्यांची सही आणि पालकांची सही ही कागदपत्रे आवश्यक आहेत. ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 सप्टेंबर, 2025 आहे. असेही कोसे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.