*जय वळवीचा खून करणा-यांना अटक करून फाशी द्या- आदिवासी संघटनांची मागणी,आदिवासी संघटना आक्रमक*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जय वळवीचा खून करणा-यांना अटक करून फाशी द्या- आदिवासी संघटनांची मागणी,आदिवासी संघटना आक्रमक*
*जय वळवीचा खून करणा-यांना अटक करून फाशी द्या- आदिवासी संघटनांची मागणी,आदिवासी संघटना आक्रमक*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथे 16 सप्टेंबर 2025 रोजी जय वळवी या आदिवासी युवकावर पोलिसादेखत चाकूने प्राणघातक हल्ला करून खून करणा-या संशयीत आरोपी सूर्यकांत सुधाकर मराठेसह आरोपीविरुद्ध व पोलिस कर्मचारी चेतन चौधरी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा, फाशी द्या व घटनेची एसआयटी चौकशी करून खुनाचा कटकारस्थान करणा-या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करा, अशी मागणी बिरसा फायटर्स या आदिवासी संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदूरबार व पोलीस अधीक्षक नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नंदुरबार येथे 16 सप्टेंबर 2025 रोजी रात्री सूर्यकांत सुधाकर मराठेसह आरोपींनी तसेच पोलिस कर्मचारी चेतन चौधरी यांच्या देखत संगनमताने जय वळवी नावाच्या आदिवासी युवकावर चाकूने वार करून त्याचा भररस्त्यात हत्या करण्याचा प्रयत्न केला. त्या परिणामाने दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास जय वळवीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना नंदुरबार येथील सिंधी काॅलनीत घडली आहे. या प्राणघातक हल्ल्याचा बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ हा सीसी टिव्ही कॅमेरात रेकॉर्ड झाला असून तो सर्वत्र वायरल होत आहे. वायरल व्हिडिओ मध्ये दावा करण्यात येत आहे की ज्या व्यक्तीने हत्या करण्याचा प्रयत्न केला तो एक पोलिससोबत आलेला. पोलीस कर्मचारी चाकू हल्ल्याची बघ्याची भूमिका बजावत आहे. यावरून पोलीस प्रशासनावर संशय निर्माण होत आहे. नंदुरबार पोलिसांनी या संपूर्ण घटनेची स्वतंत्र एसआयटीने चौकशी करावी. दोषीसह जो पोलिस सोबत आहे त्याला निलंबित करून त्याच्यावर हत्येचा खटला चालवावा. अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. असा आंदोलनाचा इशारा आदिवासी संघटनांनी दिला आहे.