*विकसित भारत 2047' या केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन - राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून दिनांक 17सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2025 या कालावधीमध्ये विद्यापी

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विकसित भारत 2047' या केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन - राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून दिनांक 17सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2025 या कालावधीमध्ये विद्यापी
*विकसित भारत 2047' या केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन - राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून दिनांक 17सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2025 या कालावधीमध्ये विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावर विविध उपक्रम आयोजन*
नंदूरबार(प्रतिनिधी):-'विकसित भारत 2047' हा भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापूर्वी विकसित राष्ट्र बनण्याच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या उद्देशाने एक उपक्रम आहे. 2047 मध्ये भारत स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षाच्या जवळ येत असताना, हा उपक्रम व्यापक आणि शाश्वत विकास साध्य करण्यासाठी आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय आणि प्रशासनिक क्षेत्रात प्रयत्नांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करतो. ही संकल्पना भारताला एक आघाडीची जागतिक शक्ती म्हणून जगासमोर आणण्याची क्षमता दर्शवितो. तरुणांमध्ये हा विचार पुढे नेण्यासाठी "विकसित भारत राजदूत युवा कनेक्ट" कार्यक्रम भारत सरकार तर्फे आयोजित केला जाणार असून, याचा उद्देश भारताच्या विकासात्मक परिवर्तनात तरुणांचा सहभाग आणि नेतृत्व वाढवणे हा आहे. या अनुषंगाने राज्यामध्ये या संदर्भात विविध उपक्रम / कार्यक्रम आयोजित करून पंतप्रधान यांच्या विकसित भारताच्या दृष्टिकोनाला जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचवणे हा आहे.
या निमित्ताने उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्यातर्फे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या दरम्यान "विकसित भारत संवाद online व्याख्यानमाला" आयोजित करण्यात येत असून या व्याख्यानमालेत राष्ट्रीय /आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञ व्यक्ती विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच राष्ट्रीय सेवा योजना उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्यातर्फे राज्यातील विद्यापीठे/महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजना एकक माध्यमातून रक्तदान शिबिर, स्वच्छतोत्स्व, आरोग्य तपासणी शिबिर, युवा संवाद, जागतिक पर्यावरण आरोग्य दिवसानिमित्त जनजागृती करणे, विश्व पर्यटन दिवस निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांबाबत व त्यांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याबाबत व्याख्यान, शहीद भगतसिंह यांच्या जयंतीनिमित्त युवकांमध्ये देशभक्ती, साहस व त्यांचे आदशांचे स्मरण करण्यासाठी व्याख्यान, विविध विषयांवर पथनाटय इ. कार्यक्रम आयोजित करणेबाबत तसेच 25 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रीय स्वच्छता अभियान अंतर्गत सर्व नागरिकांना हाताची साखळी करून संपूर्ण देशभरात आणि राज्यातही श्रमदान अंतर्गत "एक दिन, एक घंटा, एक साथ" हे एक तासाचे अभियान राबविणेबाबत विद्यापीठ तसेच महाविद्यालयांना सूचना दिलेल्या आहेत.