*पेंडखळे चिपटेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात पाडा ठार, लागोपाठ हल्ल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पेंडखळे चिपटेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात पाडा ठार, लागोपाठ हल्ल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण*
*पेंडखळे चिपटेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात पाडा ठार,
लागोपाठ हल्ल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील पेंडखळे चिपटेवाडीत वाघांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाची घटना ताजी असतानाच आज पुन्हा चिपटेवाडीतील शेतकऱ्याच्या दोन वर्षांच्या पाडयाला बिबट्याने ठार केले आहे. चिपटेवाडीतील शेतकरी जितेन्द्र खानविलकर यांचा 2 वर्षांचा पाडा रानात चरण्यासाठी गेला असता बिबट्याने हल्ला करुन त्याला ठार केले आहे. बिबट्याकडून वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे पेंडखळे व आसपासच्या परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले असून दिवसाही घराबाहेर पडण्यास धजावत आहेत वनविभागाने सातत्याने हल्ले करणाऱ्या या हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि खानविलकर यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.